एक्स्प्लोर
बँक अधिकारी बेपत्ता, रक्ताने माखलेली कार सापडली
सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे, घराकडे निघाले होते. मात्र ते घरापर्यंत पोहोचलेच नाहीत.
मुंबई: खासगी बँकेतील बेपत्ता अधिकाऱ्याची कार रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ संघवी असं बेपत्ता अधिकाऱ्याचं नाव आहे. सिद्धार्थ संघवी हे कमला मिल परिसरातील एका बड्या खासगी बँकेत व्हॉईस प्रेसिडेंटपदी काम करतात.
सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे, घराकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलंही होतं. मात्र ते घरापर्यंत काही पोहोचलेच नाहीत.
बराच वेळ ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन लावून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता. रात्रभर शोधाशोध करुन, वाट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपास चालू केला असता, शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. या गाडीत रक्ताचे डाग होते. त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आहे.
सिद्धार्थ संघवी यांच्या अपहरणाची शक्यता आहे, मात्र अद्याप अपहरणकर्त्यांकडून कोणताही फोन किंवा संपर्क झालेला नाही.
पोलिसांनी जिथे गाडी सापडली, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यास सुरुवात केली आहे. या फुटेजमध्ये दोन जण संशियतरित्या दिसले आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
सिद्धार्थ संघवी हे मलबार हिलमध्ये पत्नी, मुलगा आणि आई-वडिलांसोबत राहतात. पोलिसांना अपहरणाचा संशय असला तरी अपहरणकर्त्यांकडून कोणताही संपर्क झालेला नसल्याने, पोलिसांसमोरही मोठा गुंता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement