Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, लालबागचा राजा यंदा विराजमान होणार
Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. लालबागचा राजा यंदा विराजमान होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई : लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. लालबागचा राजा यंदा विराजमान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी कोव्हिड 19 संसर्गामुळे लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे कार्याच्या मंडळाच्या बैठकीत ठरले आहे.
मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध जे नियम शासनाने घालून दिली आहे त्याचे सुद्धा काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल. लालबाग राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांना हे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी सुद्धा मंडळा कडून तयारी केली जाणार आहे.
Mumbai | Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal to celebrate Ganesh Utsav in traditional way this year adhering to all COVID19 related guidelines &restrictions
— ANI (@ANI) August 1, 2021
Last year, a blood & plasma donation camp was organised in place of Ganesh Mahotsav celebrations due to COVID
(file pic) pic.twitter.com/adUaBuKjHx
लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी सांगितलं की, खरंच लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी कारण काल झालेल्या मंडळाच्या बैठकीत यावर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन ,ऑनलाइन प्रसादाची सुविधा सुविधा केली जाणार आहे.त्यामुळे येथे कुठेही गर्दी होणार नाही.
साळवी म्हणाले की, यावर्षी लालबाग राजाची प्राणप्रतिष्ठपणा करताना दुसरीकडे राज्य शासनाने जे नियम घालून दिले आहे त्याचे काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल. शिवाय पुढे सुद्धा त्या सूचना मिळतील त्याचे सुद्धा पालन होईल. गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा नसून नये अशी आमची मागणी राज्य सरकारकडे होती, मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे चार फुटाची मूर्तीची उंचीची मर्यादा असल्यामुळे चार फुटांचा लालबागचा राजा या वर्षी विराजमान करण्याचे नियोजन सध्या तरी झालेलं आहे.
गणेशोसव नेहमीप्रमाणे असला तरी त्यामध्ये साधेपणा असेल दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य सजावट रोषणाई नसेल. पाद्यपूजन सोहळा सुद्धा साधेपणाने साजरा केला जाईल त्याबाबत सुद्धा लवकरच मंडळ ठरवेल, असं साळवी यांनी सांगितलं























