एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण सोन्याचांदीच्या वस्तूंचा आज लिलाव

Lalbaugcha Raja Auction 2022 : लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja News) भक्तांनी यावर्षीही भरभरून दान दिलं आहे. बाप्पाच्या चरणी आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा आज लिलाव होणार आहे.

Lalbaugcha Raja Auction 2022 : गेली दोन वर्ष कोरोनामुळे भक्तांना लालबागच्या  राजाचं (Lalbaug News) ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलं. मात्र यंदा थेट बाप्पाच्या चरणाशी जाऊन भक्तांना बाप्पाचं रुप डोळे भरून पाहता आलं. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी दहा दिवस भक्तांनी गर्दी केली होती. मुंबईत (Mumbai) लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja News) भक्तांनी यावर्षीही भरभरून दान दिलं आहे. भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलं आहे. याशिवाय सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडे असे सोन्याचे दागिनेही लालबागच्या राजाला भक्तांनी दान दिले आहेत. चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाला अर्पण केल्या आहेत. लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा आज लिलाव होणार आहे.

लालबागच्या राजाची 'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती आहे. दरवर्षी लाखो भक्तगण बाप्पाच्या चरणी दान देतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक गर्दी करतात. दरवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळाच्या वतीने दिली जाते. सोने, चांदी, रोख रक्कम याशिवाय दानपेटीत चिठ्ठ्या टाकून भाविकांनी लालबागच्या राजाला आपल्या मनातल्या भावनाही कळवल्या जातात.  मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दानपेटीत गणेशभक्तांकडून जितकं सढळ हातानं दान करण्यात येतं, तितक्याच सहजतेनं काही भक्त आपलं मनही देवाकडे मोकळं करत असतात.

राजाच्या दानपेटीत किती देणगी जमा होते, याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी लोकांमध्येही कुतूहल पाहायला मिळतं. ही भक्तमंडळी दरवर्षी लालबागच्या राजाला पत्र (Letter To Lalbaugcha Raja)  लिहून गाऱ्हाणं मांडत असतात. अवघ्या पाच दिवसात 'लालबागचा राजा'च्या चरणी अडीच कोटीचे दान जमा झालं होतं. पहिल्या पाच दिवसांत लालबागच्या राजाच्या चरणी जवळपास 250 तोळे सोनं आणि 2900 तोळे चांदीचं दान अर्पण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येतात. मुंबईतील गणेशोत्सवाचं संपूर्ण जगभरात आकर्षण आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येतात. भक्तगण आपल्या पात्रतेप्रमाणे बाप्पाच्या चरणी दान देतात. सोने, चांदी, रोखरक्कम, दागिने असं दान भक्तांकडून देण्यात येतं. गणेशोत्सवानंतर मंडळाकडून दान केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्याABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
Embed widget