एक्स्प्लोर
Advertisement
2017 च्या लालबागच्या राजाचा फोटो व्हायरल
मुंबई : गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मूर्तीकार गणेशमूर्ती तयार मग्न आहेत. दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यंदा लालबागच्या राजाचं रुप कसं असेल, याबाबत गणेशभक्तांमध्ये कमालीचं औत्सूक्य आहे. पण सध्या लालबागच्या राजाचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून, 2017 मध्ये लालबागच्या राजाचं स्वरुप असं असेल, असा दावा करण्यात येत आहे.
यंदा 25 ऑगस्ट 2017 रोजी गणरायाचं आगमन होत आहे. त्यामुळे गणेश मूर्ती तयार करण्याची गणेश मूर्तीकारांमध्ये लगबग सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचं रुप काय असेल, याबाबत गणेशभक्तांमध्ये कमालीचं औत्सुक्य आहे.
दरवर्षी लालबागचा राजाबद्दल गणेश मंडळ आणि गणेश मूर्तीकार कमालीची गुप्तता पाळतात. पण यंदा सोशल मीडियावर लालबागच्या राजाचा एक फोटो व्हायरल होत असून, हा फोटो 2017 च्या लालबागच्या राजाचा असल्याचं सांगितलं जात आहे.
या फोटोत लालबागच्याच राजाच्या स्वरुपातील गणपतीची मूर्ती दिसत आहे. पण दरवर्षीप्रमाणे या गणेश मूर्तीच्या प्रभावळीत बदल असल्याचे दिसत आहे. यंदाची लालबागच्या राजाची प्रभावळ कृष्णाच्या स्वरुपातील प्रभावळ दिसत आहे.
गेल्यावर्षी लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीच्या प्रभावळीत घुबडाची प्रतीकृती साकारण्यात आली होती. पण त्यावरुनही शुभ-अशुभ अशी चर्चा रंगली होती. पण यंदाच्या गणेश मूर्तीत कृष्णाच्या स्वरुपातील प्रभावळ साकारण्याचा दावा या फोटोतून करण्यात येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायर होत असून, याबाबत गणेश मंडळाकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement