एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत लोकल रेल्वेवरील कुर्ला-मुलुंड पट्टा सर्वात जीवघेणा
मुंबई : प्रवाशांचा निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपायाबांबत होणारी हलगर्जी यासारख्या कारणांमुळे मुंबईतील लोकल रेल्वे मृत्यूचा सापळा ठरत असल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. मात्र आता या आरोपांना सर्वेक्षणाचं बळ मिळालं आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला ते मुलुंड हा मार्ग सर्वात जीवघेणा असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.
उपनगरी रेल्वेवरील कुर्ला ते मुलुंड हा पट्टा सर्वाधिक अपघातप्रवण असल्याचं प्रजा फाऊण्डेशनने केलेल्या एका सर्वेक्षणात पुढे आलं आहे. मुंबईत 2015 मध्ये झालेल्या एकूण (1585) रेल्वे अपघातांपैकी सर्वाधिक म्हणजे 26 टक्के (405) अपघाती मृत्यू या मार्गावर झाले आहेत. तर 18 टक्के (333) प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 2015 मध्ये 1897 जण रेल्वे अपघातांतून बचावले आहेत.
कुर्ला-विद्याविहार-घाटकोपर-विक्रोळी-भांडुप-नाहूर-मुलुंड या सात स्थानकांदरम्यान हे अपघात झाले आहेत. या अपघातांचं कारण मात्र या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलेलं नाही. रेल्वे अपघातांमागे अनेक कारणं असल्याचं रेल्वे पोलिसांनी म्हटलं आहे. रेल्वे क्रॉसिंग करणं हे अपघातांमागील सर्वात मोठं कारण आहे. गर्दीने भरलेल्या रेल्वेबाहेर लटकताना पडणे, प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील पोकळीत पडणे यामुळेही अपघात घडतात.
ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होत असल्याचं समोर आलं आहे, तिथे संरक्षक भिंती उभारणं किंवा फूट ओव्हर ब्रिज बांधणे हे उपाय योजण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement