MHADA Lottery : मुंबईत घर घ्यायचंय? कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत काढण्याची तयारी
MHADA Lottery : मुंबईत घर घ्यायचंय? कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत काढण्याची तयारी
Mumbai MHADA Lottery : मुंबईत (Mumbai News) स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य परवडणाऱ्या दरांत घरं घेण्यासाठी म्हाडाच्या सोडतीची आतुरतेनं वाट पाहत असतात. अशातच आता कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत निघण्याची शक्यता आहे. तर ठाणे, विरारसह अन्य भागातील 4 हजारांहून अधिक घरांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत परवडणाऱ्या दरात आपलं हक्काचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळामार्फत ठाणे, विरार इत्यादी भागांत सोडतीच्या रूपात अधिकाधिक घरं उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकण मंडळामार्फत डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या आगामी सोडतीमध्ये ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील घरांचा समावेश असणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळानं 14 ऑक्टोबर 2021 रोजी 8,984 घरांची सोडत काढली होती. तेव्हा, दोन लाख 46 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. म्हाडाच्या नियमांनुसार, विजेत्यांची पात्रता निश्चितीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना घरे सुपूर्द केली. त्यापाठोपाठ एका वर्षानंतर कोकण मंडळानं चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याचे ठरवलं आहे. त्यासाठी अर्जदारांची प्रथम पात्रता निश्चिती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सॉफ्टवेअरही तयार केले आहे. म्हाडाकडून या सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू असून त्यास यश येताच सोडतीचा मार्ग खुला होणार असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ : कोकण MHADAच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत, तर CIDCOच्या घरासाठी आज होणार सोडत
सिडकोच्या (CIDCO) चार हजार घरांसाठीही आज सोडत
सिडकोच्या चार हजार घरांसाठी आज सोडत निघणार आहे. तर खासगी विकासकांपेक्षा सिडकोच्या घरांना जास्त मागणी आहे. बेलापूर येथील मुख्यालयाच्या सभागृहात पार पडणाऱ्या या सोडतीसाठी 16 हजार अर्ज आले असून सिडकोने परवडणाऱ्या घरांसाठी अनामत रक्कम वाढविल्याने येणारी लाखोंमधील अर्ज संख्या हजारावर आली आहे. बेलापूर येथील मुख्यालयाच्या सभागृहात पार पडणाऱ्या या सोडतीसाठी 16 हजार अर्ज आले असून सिडकोनं परवडणाऱ्या घरांसाठी अनामत रक्कम वाढविल्यानं येणारी लाखोंमधील अर्ज संख्या हजारावर आली आहे.