एक्स्प्लोर
कपिल शर्माचा बोलविता धनी कोण हे स्पष्ट करावं, शिवसेनेचं आव्हान

मुंबई : कॉमेडीयन कपिल शर्माने मुंबई महापालिकेत लाच मागितल्याबाबत ट्वीट केल्यानंतर आता शिवसेनेने कपिलवर निशाणा साधला आहे. कपिल शर्माच्या आरोपांमध्ये कॉमेडी आहे का ते बघावं लागेल, असे म्हणत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे. "कपिल शर्माच्या आरोपांमध्ये कॉमेडी आहे का, ते बघावं लागेल. पडद्यावरची कॉमेडी जर प्रत्यक्षात आणली आणि विनाकारण शिवसेनेचं नाव घेतलं, तर शिवसेना त्याचं कॉमेडी स्टाईलनं उत्तर देईल.", असा दम नगरसेविका किशोरी पेडणेकरांनी दिला आहे. "कपिल शर्माचा बोलवता धनी कुणीतरी दुसराच आहे. हा बोलवता धनी कोण आहे, हे सुद्धा शोधलं पाहिजे.", असे पेडणेकर म्हणाल्या. "कोणाचं नाव माहित नाही, पैसे कोणाला द्यायचे, हेही माहित नाही. तर मग कोणी शर्मा-वर्माने उठावं आणि महापालिकेचं नाव घ्यावं हे सहन करणार नाही. मुंबईचे बॉम्बे किंवा बम्बई नाव करण्याचा विचार करणारेच या सगळ्याच्या पाठीमागे आहेत काय हे पाहावं लागेल.", असे म्हणत पेडणेकरांनी नव्या राजकीय वादालाही तोंड फोडलं आहे. काय आहे प्रकरण ? मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्यांनी 5 लाखांची लाच मागितली, असा आरोप कॉमेडी किंग कपिल शर्माने केला आहे. ट्विटरवर कपिलने मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर सडकून टीका करत, पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे. कपिल शर्माने ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे. “मागील पाच वर्षांपासून 15 कोटींचा आयकर भरत आहे. तरीही कार्यालय बनवण्यासाठी माझ्याकडून मुंबई महापालिकेने 5 लाखांची लाच मागितली,” असा संताप कपिलने व्यक्त केला.
संबंधित बातम्या :
बीएमसीने 5 लाखांची लाच मागितली : कपिल शर्मा
कपिल भाई, लाचखोराचं नाव सांग, त्याला सोडणार नाही : मुख्यमंत्री
कपिल शर्माचं ऑफिसच वादात, ते ट्विट कपिलवरच उलटणार?
कपिलचा मुखवटा घालून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
आणखी वाचा























