एक्स्प्लोर

कमला मिल कम्पाऊंड अग्नितांडव, आरोपींचा जामीन फेटाळला

जे घडलं तो अपघात असला, तरी ज्या परिस्थितीत हे पब्ज चालवले जात होते, ते टाळलं असतं तर ही जीवितहानीही टाळता आली असती, असं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलं आहे.

मुंबई : कमला मिल कम्पाऊंड अग्नितांडव प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही. 'मोजोस् ब्रिस्टो' पबचे मालक युग पाठक, 'वन अबव्ह' पबचे मालक जिगर संघवी, क्रिप्रेश संघवी आणि अभिजीत मानकर यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. जे घडलं तो अपघात असला, तरी ज्या परिस्थितीत हे पब्ज चालवले जात होते, ते टाळलं असतं तर ही जीवितहानीही टाळता आली असती, असं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. 'मोजोस् ब्रिस्टो'चे संचालक युग पाठक, युग टुली, 'वन अबव्ह' संचालक क्रिपेश संघवी, अभिजीत मानकर यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआरटीपी अंतर्गत पालिकेने हा एफआयआर दाखल केला होता. तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच युग टुलीचाही जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. 29 डिसेंबरच्या रात्री कमला मिल कम्पाउंड मधील 'वन अबव्ह' आणि 'मोजोस् ब्रिस्टो' या रेस्टोबारना लागलेल्या आगीत गुदमरुन 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिपेश संघवी, जिगर संघवी, अभिजीत मानकर, युग टुली आणि युग पाठक यांच्यावर सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, दुसऱ्याच्या जीवितास कारणीभूत, अग्निविरोधक यंत्रणेचा वापर न करणं या आरोपांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget