अन् त्याच्या घरी ईदच साजरी! येमेनमध्ये हायजॅक केलेल्या जहाजावरुन कल्याणच्या तरुणाची सुटका, तीन महिन्यांचा संघर्ष
Eid-ul-Fitr 2022: रमजानच्या पवित्र महिन्यात हा तरुण घरी परतल्याने त्याच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला असून त्याच्या परतण्याने घरी रमजान ईदच साजरी झाल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे .
Kalyan Updates : मध्य आशियाई देशातील येमेन येथील हौथी बंडखोरांनी एक मालवाहू जहाज हायजॅक केले होते. या जहाजावर नोकरीस असलेल्या तरुणाची साडे तीन महिन्यानंतर सुटका झाली आहे. सुटका झालेला तरुण सुखरूप कल्याणच्या घरी पोहोचला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात हा तरुण घरी परतल्याने त्याच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला असून त्याच्या परतण्याने घरी रमजान ईदच साजरी झाल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे .
मोहम्मद मुन्नवर हा कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात आपली आई व बहिणी सोबत राहतो .2021 पासून साली मोहम्मद मुन्नवर हा आखाती देशातील खालीद फरज या शिपींग कंपनीच्या मालवाहू जहाजावर डॅक केडर पदावर कार्यरत होता. दरम्यान येमेनचे सौदी आणि संयुक्त अमिरात यांच्यासोबत संघर्ष आहे. या संघर्षात हौथी बंडखोरांनी यांनी खालीद फरज या शिपींग कंपनीचे मालवाहू जहाज हायजॅक केले.
या जहाजावर मुन्नवर कार्यरत होता .जहाज हायजॅक झाल्याची माहिती मिळताच त्याची आई बेनजीर आणि बहिण अलीजा यांची चिंता वाढली होती. मुन्नवरचे काय होणार या चिंतेने त्यांना दिवसरात्र झोप नव्हती. मात्र भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यावर हायजॅक करण्यात आलेल्या जहाजावरील मुन्नवरच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले. मुन्नवर हा जहाजावरुन सुटून कल्याणच्या घरी सुखरुप परतला आहे.
मुन्नवर याच्यासह त्याच्या आईने मोदी सरकारचे आभार मानले आहेत. मुन्नवर यांनी जहाज हायजॅक झाल्यावर आम्ही भयभीत झालो होते. आमचे पुढे काय होणार जगणार की नाही याची काही एक शाश्वती नव्हती. त्याठिकाणी जहाजावरील एका खोलीत आम्हाला कोंडून ठेवले होते. जेवण दिलं जात होतं आम्ही नजर कैदेत होतो.
आठवडाभरानंतर आम्हाला कुटुंबाशी बोलण्यास सांगितलं .मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला माझ्या आई व बहिणाने भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यावर फोनाफोनी सुरु झाली. चर्चा सुरु झाली. तेव्हा कुठे तिथून सुटका होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. आमची सुटका झाली. मी घरी सुखरुप परतलो. आमच्या मी आल्याचा आनंद इतका होता की तो गगनात मावणारा नव्हता. माझ्या येण्याने घरी ईदच साजरी झाल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. मुन्नवरने भारत सरकारचे देखील आभार मानल.