एक्स्प्लोर

Kalyan : तो आला अन् दहा तास यंत्रणा वेठीस... कल्याणमध्ये बिबट्याचा इमारतीत मुक्काम, नागरिकांमध्ये दहशत

Kalyan Leopard News : तब्बल दहा तास रेस्क्यू यंत्रणेसह नागरिकांना देखील या बिबट्याने वेठीस धरलं होतं. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर कल्याणमधील नागरिकांनी देखील सुटकेचा श्वास सोडला..

Kalyan Leopard News : कल्याण पूर्वेतील नागरिकांसाठी आजचा दिवस चांगलाच दहशतीचा ठरला. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा काटेमानवली परिसरातील श्रीराम अनुग्रह इमारतीमध्ये चक्क बिबट्या शिरला. त्याआधी त्याने दोन जणांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. या बिबट्याने आधी एका व्यक्तिवर हल्ला केला, त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टीममधील प्राणी मित्रावर देखील बिबट्याने हल्ला केला. अखेर वनविभाग, पोलीस, संजय गांधी उद्यान रेस्क्यू पथक अग्निशमन विभाग, प्राणी मित्र संघटनेच्या 10 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. तब्बल दहा तास रेस्क्यू यंत्रणेसह नागरिकांना देखील या बिबट्याने वेठीस धरलं होतं. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर कल्याणमधील नागरिकांनी देखील सुटकेचा श्वास सोडला..

कल्याणमध्ये आज सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली. कल्याण पूर्व काटेमानवली परिसरातील श्रीराम अनुग्रह इमारतीमध्ये एक वाट चुकलेला बिबट्या शिरला. बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. याच दरम्यान बिबट्याने दोन जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं.  या घटनेची माहिती मिळताच कल्याण वन विभागाचे पथक, कोळशेवाडी पोलीस आणि अग्निशामक दलही आले. 

इमारतीमध्ये दबा धरून बसलेला बिबट्याच असल्याची खात्री झाल्यानंतर बिबट्याच्या सुटकेसाठी ठाणे वनविभाग, कल्याण वन विभाग, बदलापूर वनविभाग तसेच संजय गांधी उद्यान रेस्क्यू टीम, वॉर प्राणीमित्र संघटना, पॉज प्राणी मित्र संघटना घटनास्थळी दाखल झाले. इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर बिबट्या असल्याचे लक्षात आल्यानंतर रेस्क्यू टीमने इमारतीला तिन्ही बाजूंनी जाळ्या लावल्या. 

या बिबट्याला खाली उतरवण्यासाठी फटाके फोडले, दरवाजे ठोठावण्यात आले. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.  मात्र काही केल्या बिबट्या खाली येत नव्हता. अखेर डार्ट गणची मदत घेण्यात आली. कल्याण ठाणे वनविभाग,  बोरिवली नॅशनल पार्कचे  सहाय्यक वन अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथक, वॉर आणि पॉज संस्थेच्या रेस्क्यू कर्मचाऱ्यांसह आजूबाजूच्या परिसरातील रेस्क्यू टीमचे 60 ते 70 पेक्षा जास्त लोकांचे पथक सकाळपासून बिल्डिंगभोवती दबा धरून बसले होते. वन विभागाचे अधिकारी 6 डार्ट गनच्या मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. 

बिल्डिंगच्या प्रत्येक प्रवेश द्वारावर रेस्क्यू टीमने 10 तास खडा पहारा दिला. प्रवेश द्वार जाळी लावून बंदिस्त करण्यात आले होते.  कधी इमारतीच्या छतावर तर कधी पहिल्या मजल्यावरील खिडकीतून इमारतीत उतरत  बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बिबट्याला गनच्या मदतीने टीम लीडर दिनेश गुप्ता यांनी बिबट्याला जायबंदी करण्याच्या प्रयत्न केला. मात्र बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या चेहरा आणि हाताला ओरखडे उमटले. तर यावेळी संरक्षक जाळी पकडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता हर्षल साळवी यांच्या हातावर देखील बिबट्याच्या नखाचा वार झाल्याने ते ही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रेस्क्यू टीमने हार मानली नाही, पुन्हा प्रयत्न सुरू केले. अखेर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास तब्बल 10 तासाहून अधिक झुंजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. डार्ट गनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले आणि बिबट्या जेरबंद झाला. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.  

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil On Devendra Fadnavis Meet: तुम्हाला राज्याचं अर्थमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा; पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटील पहिले हसले आणि म्हणाले...
तुम्हाला राज्याचं अर्थमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा; जयंत पाटील पहिले हसले आणि म्हणाले...
Sanjay Raut: रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
Jayant Patil Meet Devendra Fadnavis: जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?
जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule News: धुळ्यात प्रसूतीदरम्यान 21 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णालय परिसरात रात्रभर तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, नेमकं घडलं काय?
धुळ्यात प्रसूतीदरम्यान 21 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णालय परिसरात रात्रभर तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, नेमकं घडलं काय?
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Sanjay Raut: रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
Embed widget