एक्स्प्लोर

BJP wins 2 seats KDMC Election 2026 : मोठी बातमी: मतदानापूर्वीच भाजपचे दोन उमेदवार जिंकले, कमळ फुललं

Kalyan Dombivli Municipal Election : पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजप उमेदवार आसावरी नवरे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

डोंबिवली : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला. कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipal Election) निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं खातं उघडलं आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्याची आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे.(Kalyan Dombivli Municipal Election)

Kalyan Dombivli Municipal Election : प्रभागात केवळ भाजप उमेदवाराचाच आला अर्ज अन्...

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने दोन जागांवर मतदानापूर्वीच 'कमळ' फुलवलं. 'प्रभाग १८ अ'मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांनीही विजय मिळवला आहे.

Kalyan Dombivli Municipal Election : आसावरी केदार नवरेंच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने बिनविरोध निवड

आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 (अ) मधून बिनविरोध विजय मिळवला आहे.

Kalyan Dombivli Municipal Election : मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकच अर्ज दाखल झाला

18 अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली आहे. त्यामुळं राज्यात भाजप महापालिका निवडणुकीत विजयाचे खाते उघडणार आहे. निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड होणार आहे. 

Kalyan Dombivli Municipal Election : रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या

रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची अधिकृत प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 अ मधून त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल जाला आहे. कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्याने रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड होणार आहे. 

Kalyan Dombivli Municipal Election : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget