एक्स्प्लोर

रिक्षाचालकाची मुजोरी, महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं!

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एमएफसी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

कल्याण : लायसन्स मागणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला मुजोर रिक्षाचालकाने अक्षरशः फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकारानंतर पोलिसांनी या उद्दाम रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहे. रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस कशी वाढत चालली आहे, याचं आणखी एक उदाहरण कल्याणमध्ये समोर आलं आहेत. ही घटना काल (9 ऑक्टोबर) संध्याकाळची आहे. कल्याणच्या वाहतूक शाखेत काम करणाऱ्या कॉन्स्टेबल आशा गावंडे या काल संध्याकाळी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक नियंत्रणाचं काम करत होत्या. यावेळी नागेश अल्वागिरी हा रिक्षाचालक गणवेश न घालता रिक्षा चालवत असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी त्याला थांबवून लायसन्स मागितलं. मात्र यावेळी थांबण्याऐवजी नागेश याने रिक्षा भरधाव वेगात कल्याण कोर्टाच्या दिशेनं दामटवली. यावेळी वाहतूक पोलीस आशा गावंडे यांनी मात्र रिक्षा धरुन ठेवत असल्याने त्या रिक्षेसोबत फरपटत गेल्या आणि मोठा गोंधळ उडाला. ही घटना पाहून तिथे उपस्थित अनेकांनी रिक्षेच्या मागे धाव घेतली आणि गावंडे यांची सुटका केली. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षाचालक नागेश अल्वागिरीलाही पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण स्टेशन परिसरात यापूर्वीही रिक्षाचालकांच्या मुजोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र तरीही रिक्षाचालकांना शिस्त लावण्यात पोलीस कमी पडत असून त्यामुळे अशाप्रकारे पोलिसांवरच हल्ले करण्यापर्यंत रिक्षाचालकांची मजल गेली आहे. कल्याण आरटीओअंतर्गत आजमितीला तब्बल 54 हजार अधिकृत रिक्षा रस्त्यावर धावत असून त्यापैकी 24 हजार रिक्षा या एकट्या कल्याणमध्ये आहेत. तर अनधिकृत रिक्षांची संख्याही मोठी आहे. मात्र या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी कुठलीही कडक पावलं उचलली जात नसल्यानं मुजोरीचे प्रकार वाढत चाललेत. याला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Sanjay Shirsat VIDEO : राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 
राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget