एक्स्प्लोर

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने लालबागच्या राजाच्या गर्दीचे काढलेले व्हिडीओ; चारवेळा मुंबई दौरा केल्याचं उघड

Jyoti Malhotra: यूट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. पाकिस्तानची हेर गद्दार ज्योती मल्होत्रा हिने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालं आहे.

Jyoti Malhotra: यूट्युबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिनी अखेर आयएसआयशी संबंधांची दिली कबुली दिली आहे. याचदरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योती मल्होत्राने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानची हेर गद्दार ज्योती मल्होत्रा हिने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालं आहे. ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आला आहे. ज्योती मल्होत्राने 2024 मध्ये तीनवेळा तर 2023 मध्ये एकदा मुंबईवारी केली. मुंबईत अनेक भागात तिने फोटो, व्हिडीओ काढले. 2023 मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी, याचा व्हिडीओ तिने काढला. हे व्हिडीओ, फोटो तिने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे. मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिने ते नंतर डिलीट केलेत. ते विशेष डिव्हाईसे पुन्हा रिकव्हर करण्यात आलेत. 

ज्योती मल्होत्राची अखेर कबुली-

पाकिस्तानात अली हसनने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर 'जट रधाँवा' नावे केला सेव्ह होता. शाकीरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातली माहिती दिल्याची कबुली गद्दार ज्योती मल्होत्राने दिली आहे. तसेच दानिशच्या मदतीने केल्या पाकिस्तानच्या दोन फेऱ्या मारल्याचं देखील ज्योती मल्होत्राने म्हटलं आहे. मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागली. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली, अशी हादरवणारी माहिती ज्योती मल्होत्राने दिली आहे. 

ज्योतीला आज हिसार कोर्टात हजर केले जाणार-

पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज हिसार कोर्टात हजर केले जाणार आहे. हजर केल्यानंतर ज्योतीची कोठडी वाढवून मागितली जाण्याची शक्यता. हिसार पोलिसांचे निवेदन , ज्योती काही पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होती आणि त्यांना काही माहिती पुरवली. पोलिसांनी ज्योतीकडून 3 मोबाइल फोन, एक लॅपटॉप आणि काही इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केली, ज्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांनीही ज्योतीची चौकशी केली. ज्योतीच्या 4 बँक खात्यांची चौकशी सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्याकडे वकील करण्यासाठी पैसे नाहीत, सरकारने वकील उपलब्ध करावा, असं ज्योतीच्या वडिलांनी मागणी केली आहे.

कोण आहे ज्योती मल्होत्रा?

युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही सामान्य घरातील मुलगी आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याचे सांगितले जात आहे. वडिलांसोबत एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमावण्याची इतकी घाई होती की उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिने त्वरित नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी स्वीकारली होती.रिसेप्शनिस्टची नोकरी सोडल्यानंतर ज्योती मल्होत्रा हिसारपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागली. मात्र, तिने तिथेही फार काळ काम केले नाही आणि नंतर हिसारमधील एका कॉलेजजवळ असलेल्या मार्केटमध्ये एका खाजगी कार्यालयात पुन्हा रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले. सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.

संबंधित बातमी:

Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी बनली होती ॲसेट; चीनसाठीही हेरगिरी?, नवीन कनेक्शन समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget