एक्स्प्लोर

Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी बनली होती ॲसेट; चीनसाठीही हेरगिरी?, नवीन कनेक्शन समोर

Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे.

Jyoti Malhotra: भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan War) संबंध ताणले गेले असतानाच आता यूट्यूबरच्या मुखवट्या पलीकडे असलेल्या हेरगिरांचा खरा चेहरा समोर येत आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिला अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा पाकच्या आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केलाय जात आहे. दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. यावेळी ज्योतीच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ज्योती मल्होत्रा ॲसेट (खास व्यक्ती) बनली होती, असं हळूहळू समोर येतंय.

पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा अधिकारी दानिशनं ज्योतीची आणखी दोघांशी ओळख करून दिली. या तिघांशीही ज्योतीचे चांगले संबंध होते. पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर आयएसआयची नजर असते. व्हिसा मिळवतानाच  ज्योतीचा आयएसआयशी संबंध आल्याची माहिती आहे. ज्योती चार वेळा पाकिस्तानमध्ये गेली यावेळी ती कोणाकोणाला भेटली, एसआयला गोपनीय माहिती पुरवण्यामध्ये तिच्यासोबत आणखी कोण कोण सामील आहे ? यासंदर्भात तिला विचारणा करण्यात येतेय. त्यामुळे या चौकशीदरम्यान आणखी काय नवीन खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पाकिस्तानसह चीनलाही जाऊन आलीय ज्योती मल्होत्रा-

हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्यूएन्झर्सशीही संपर्क असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी सुरु आहे. कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली. तर  इतर इन्फ्ल्यूएन्झर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते. तसेच पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली आहे. 

कोण आहे ज्योती मल्होत्रा?

ज्योती मल्होत्रा ही एक भारतीय युट्यूबर आणि ट्रॅव्हल व्लॉगर आहे, जिला अलीकडेच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तीच्या या कारवायांमुळे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्योतीने आपल्या करिअरची सुरुवात रिसेप्शनिस्ट आणि शिक्षिका म्हणून केली. नंतर तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये प्रवेश केला आणि "Travel with Jo" या युट्यूब चॅनेलवर विविध देशांतील प्रवासाचे व्हिडीओ शेअर करू लागली. तिच्या व्हिडिओंमध्ये पाकिस्तानातील पर्यटन स्थळांची माहिती आणि त्या देशाच्या बाजूने विचार मांडले जात होते. या माध्यमातून तीने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ज्योतीच्या युट्यूब चॅनेलमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची चौकशी सुरू आहे. अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती लाखो रुपयांमध्ये असून, ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय आहे. तिच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सुरक्षा यंत्रणा सखोल तपास करत आहेत.

हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक, VIDEO:

संबंधित बातमी:

Abu Saifullah: अबू सैफुल्लाहचा खात्मा, अज्ञात व्यक्तीकडून खेळ खल्लास; दहशतवाद्यांचा आका म्हणून ओळख; कोण आहे सैफुल्लाह?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
बेदरकार क्रेट कारनं गरोदरपणाच्या टेस्टला जाताना बाप अन् कष्टानं शिकलेल्या वकील लेकीचा जीव घेतला, अवघ्या सात महिन्यांपूर्वी आईचं छत्र हरवलं; कोल्हापुरात शाहू मिल चौकात दोन कुटुंबाची क्षणात राखरांगोळी
बेदरकार क्रेट कारनं गरोदरपणाच्या टेस्टला जाताना बाप अन् कष्टानं शिकलेल्या वकील लेकीचा जीव घेतला, अवघ्या सात महिन्यांपूर्वी आईचं छत्र हरवलं; कोल्हापुरात शाहू मिल चौकात दोन कुटुंबाची क्षणात राखरांगोळी
सीटीईटी परीक्षा देणाऱ्या महिलांना रोखलं; परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र व दागिने काढण्याची सूचना, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
सीटीईटी परीक्षा देणाऱ्या महिलांना रोखलं; परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र व दागिने काढण्याची सूचना, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सूर्यानं लाज राखली अन् किंग कोहलीच्या अशक्यप्राय विक्रमाला सुद्धा गवसणी घातली! नेमकं घडलं तरी काय?
टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सूर्यानं लाज राखली अन् किंग कोहलीच्या अशक्यप्राय विक्रमाला सुद्धा गवसणी घातली! नेमकं घडलं तरी काय?
Sharad Pawar and Parth Pawar: पोरं घडवायला वस्ताद पुन्हा मैदानात! शरद पवारांचा नातवांसोबतचा फोटो व्हायरल, रोहित पवार- पार्थ पवारांसोबत काय चर्चा केली?
पोरं घडवायला वस्ताद पुन्हा मैदानात! शरद पवारांचा नातवांसोबतचा फोटो व्हायरल, रोहित पवार- पार्थ पवारांसोबत काय चर्चा केली?
Embed widget