(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : संकट काळात शरद पवारांसोबत राहायचं, चिन्ह आणि नावाची काळजी नाही : जयंत पाटील
Jayant Paitl, Mumbai : गुंड मंत्रालयात जाऊन रिल्स बनवतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे गुंडांचे फोटो व्हायरल होतात.आता आमची मागणी आहे की, गेटवर कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवून मंत्रालयात प्रवेश मिळायला हवा, अशी खोचक टीका शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Paitl) यांनी केली आहे.
राज्यात द्वेषाचे राजकारण सुरु
जयंत पाटील म्हणाले, राज्यांत द्वेषाचे राजकारण सुरू आहे.मागील काही वर्षापासून राज्यांत हे निर्माण केलं जातं आहे. उल्हासनगरला आमदाराने गोळीबार केला आणि त्याने मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला. पोलीस ठाण्यात गोळीबार होण्याची ही पहिली घटना आहे. दहिसरला फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळीबार करण्यात केला याचं काय कारण होतं अजून काही समोर आलं नाही, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.
चिन्ह आणि नावाची काळजी करायची गरज नाही
निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. विचार प्रबोधन करणाऱ्या माणसाना राज्यात फिरु द्यायचं नाही असा प्रकार सुरू आहे. संकटाच्या वेळी आपल्याला शरद पवार यांच्यासोबत उभ राहायचं आहे. चिन्ह आणि नावाची काळजी करायची गरज नाही. कारण शरद पवार ज्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हातात घेतील ते क्षणात घरा घरात पोहचेल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांना मोठं करत असताना स्वतचं राज्य असल्याचं स्फुल्लिंग तयार केलं होतं. भारतात 12 ठिकाणी महादेवाची पूजा करण्याची व्यवस्था आहे. त्याचं कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्याचा जीर्णोध्दार केला होता.भारतातील नारी शिकली पाहिजे ही भुमिका सावित्रीबाई फुले यांची होती, असेही यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
स्त्रीयांनाही संधी मिळाली तर त्या स्वत:ला सिद्ध करु शकतात
आज सर्वजण इथे एकत्र आलो. संघटनेत काम करण्याची तयारी केली. समाजातील लोकांचे जीवन आपल्याला बदलायची आहे. स्त्री-पुरुष समानता आपल्याला आणायची आहे. स्त्रीयांनाही संधी मिळाली तर त्या स्वत:ला सिद्ध करु शकतात. मी संरक्षणमंत्री होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की, इतर देशात महिला लष्करात मोठ्या पदावर आहेत, असे शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या