एक्स्प्लोर

Tara Rani : महाराणी ताराराणी या जैन समूदायाच्या, आचार्य नयन पद्मसागर यांनी अकलेचे तारे तोडले, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

Acharya Nayan Padmasagar Speech On Tara Rani : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या भाषणातील वक्तव्यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मुंबई : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर (Acharya Nayan Padmasagar) यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराणी ताराराणी (Tara Rani) या जैन समूदायच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा (Tarabai) जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं. मुंबईतील जैन समूदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नेमकं काय म्हणाले आचार्य नयन पद्मसागर? 

जैन समूदायाच्या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, "मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केलं त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही . संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले.  त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी."

छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी 25 वर्षे औरंगजेबशी लढा दिला आणि त्याला जेरीस आणलं. ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. 

एकीकडे हा सर्व इतिहास असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी मात्र त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत. महाराणी ताराराणी या जैन समूदायाच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

नरेंद्र मोदींची स्तुती

आचार्य नयन पद्मसागर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. ते म्हणाले की, "जो समाज धर्माला विसरतो त्याला भविष्य नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळालं पण गुलाम बहरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माण केले आणि हिंदुना मोठी भेट दिली. वयाच्या 75 व्या वर्षी सुद्धा मोदीजी काम करतात. तुम्ही ते नाही करु शकत नाही."

आचार्य नयन पद्मसागर पुढे म्हणाले की, "कोणत्याही गल्लीत जा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर , संत नामदेव ऐकू येतील. आमचा धर्म कोणताही असो पण भारतात राहणारा प्रत्येक हिंदू आहे. जैन धर्म कोणत्या जातीत भेद मानत नाही. संविधान अखंड भारत बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. संविधानमध्ये कोणत्याही धर्माला वगळले नाही. मात्र जो धर्म लोकांना मारायला शिकवतो त्यावर बंदी घाला."

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget