एक्स्प्लोर

154 जण सरळ सेवेतून पीएसआय, नोकरीत सामावून घेतोय : मुख्यमंत्री

पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत मॅटने राज्यातील 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांची नियुक्ती रोखून त्यांना मूळ पदावर पाठवलं होतं.

मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीमधील 154 पीएसआयबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. "या 154 जणांचं कुठलंही प्रमोशन नाही तर ते सरळ सेवेतून पीएसआय झाले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीत सामावून घेत आहोत," अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (23 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. "आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, 154 पीएसआयना ट्रेनिंग घेतल्यानंतरही एका न्यायालयाच्या निर्णयामुळे रुजू करुन घेणं शक्य होत नव्हतं. या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे कुठलंही प्रमोशन नाही. हे रेग्यूलर एक्झाममधून आलेले पीएसआय आहेत. त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घेत आहोत," असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री काय म्हणाले? काय आहे प्रकरण? पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत मॅटने राज्यातील 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांची नियुक्ती रोखून त्यांना मूळ पदावर पाठवलं होतं. त्यामुळे नऊ महिन्यांचं प्रशिक्षण घेऊन आणि मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शपथविधी होऊनही या पीएसआयना मूळ पदावर जावं लागलं. या सर्वांना त्यांच्या मूळ जागी नियुक्त करावं किंवा नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्याचा आदेशही मॅटने दिला. या निर्णयामुळे प्रशिक्षण पूर्ण करुन नियुक्तीसाठी उत्सुक असलेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये निराशा पसरली होती. त्यानंतर या पोलिसांनी पुन्हा मॅटकडे दाद मागितली. त्यावर मॅटने संवैधानिक आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या जर्नेलसिंह प्रकरणात दिलेला निर्णय पाळा, असा आदेश राज्य सरकारला देत, 154 पीएसआयना दिलासा दिला होता. मात्र या निर्णयानंतरही  154 पोलिसांना अद्याप पीएसआयपदावर नियुक्ती झाली नव्हती. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतची घोषणा करत, 154 पीएसआयना 9 महिने खडतर प्रशिक्षण घेऊन मिळवलेले स्टार परत मानाने देण्याचा निर्णय घेतला आहे. मॅटचा निर्णय मॅटने शुक्रवारच्या (12 ऑक्टोबर) सुनावणीदरम्यान राज्यातील 154 पोलिस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीसंदर्भातील निर्णयात बदल केला. याप्रकरणी संवैधानिक आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जर्नेलसिंहच्या प्रकरणात दिलेला निर्णय पाळा असा आदेश मॅटने दिला आहे. तसंच या सुनावणीत मॅटने राज्य सरकारला फटकारलं होतं. आजही तुम्हाला भूमिका मांडायची नाही का? असा सवालच मॅटने विचारला होता. मॅटच्या या नवीन निर्णयामुळे 154 पोलिस उपनिरीक्षकांना काहीसा दिलासा मिळाला होता. कशी असते निवड प्रक्रिया? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलिस उपनिरीक्षक सेवाप्रवेश नियम 1995 मधील 3(ब) नुसार फौजदाराची निवड (by selection) 1995 पासून घेतल्या जातात. नियुक्तीसाठी 50% पदं ही एमपीएससीमार्फत सरळसेवा पद्धतीने, 25% पदं ही खात्याअंतर्गत सरळसेवा पद्धतीने (एमपीएससीमार्फत) आणि 25 % पदं सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने (डीजी कार्यालयाकडून) भरली जातात. संबंधित बातम्या सरकार आमच्या आत्महत्येची वाट पाहतंय का? : 154 PSI चा उद्विग्न सवाल मूळ पदावर पाठवलेल्या 154 जणांना पीएसआयपदी कधी रुजू करणार? वेळकाढूपणा कोण करतंय? SC/ST मधील 154 पीएसआयची अद्याप नियुक्ती नाही 154 जणांना समाविष्ट करण्यासाठी मार्ग काढतोय : मुख्यमंत्री 154 PSI नियुक्ती रद्द: हायकोर्टाच्या पर्यायाचा विचार करु: मुख्यमंत्री 154 फौजदारांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? राज्य सरकारचा ठोस निर्णय नाहीच, 154 पीएसआय मूळ पदावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी झालेल्या 154 पीएसआयच्या नियुक्त्यांवर गदा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Ranjitsinh Naik Nimbalkar: रणजित निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात? सुषमा अंधारेंचा सवाल, म्हणाल्या, तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात ही...
रणजित निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात? सुषमा अंधारेंचा सवाल, म्हणाल्या, तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात ही...
रोहित आर्याशी बोलण्यास दीपक केसरकरांनी का दिला नकार? पवई ओलीसनाट्यादरम्यान नेमकं घडलं काय?
रोहित आर्याशी बोलण्यास दीपक केसरकरांनी का दिला नकार? पवई ओलीसनाट्यादरम्यान नेमकं घडलं काय?
Amol Muzumdar Speech: आता इतरांच्या कहाण्या ऐकायच्या नाहीत, आपण स्वत:चा इतिहास घडवायचाय, पुढचे 7 तास.... फायनलपूर्वी अमोल मुझुमदारांनी टीम इंडियात विजयाची आग कशी जागृत केली?
फायनलपूर्वी अमोल मुझुमदारांचं प्रेरणादायी भाषण, पुढचे 7 तास... आपण स्वत:चा इतिहास घडवायचाय
Maharashtra Election: विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेण्याच्या तयारीत, निवडणूक आयोग महत्त्वाची घोषणा करण्याच्या तयारीत
विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Politics: 'मतदार याद्यांमधले घोळ लोकांच्या समोर ठेवले आहेत', सरिता कौशिक यांचा निर्वाळा
Maharashtra Civic Polls: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, याचिकाकर्त्यांना हायकोर्टाचा सवाल
Maha Local Body Polls: उत्तर महाराष्ट्रात महायुतीतच रस्सीखेच? Vikhe विरुद्ध Thorat सामना!
Local Body Polls: हायकोर्टात याचिकांवर सुनावणी सुरू, तर निवडणूक आयोग आजच निवडणुकांची घोषणा करणार?
Jay Pawar Election : अजित पवारांचे चिरंजीव जय पवार निवडणुकीच्या रिंगणात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Ranjitsinh Naik Nimbalkar: रणजित निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात? सुषमा अंधारेंचा सवाल, म्हणाल्या, तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात ही...
रणजित निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात? सुषमा अंधारेंचा सवाल, म्हणाल्या, तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात ही...
रोहित आर्याशी बोलण्यास दीपक केसरकरांनी का दिला नकार? पवई ओलीसनाट्यादरम्यान नेमकं घडलं काय?
रोहित आर्याशी बोलण्यास दीपक केसरकरांनी का दिला नकार? पवई ओलीसनाट्यादरम्यान नेमकं घडलं काय?
Amol Muzumdar Speech: आता इतरांच्या कहाण्या ऐकायच्या नाहीत, आपण स्वत:चा इतिहास घडवायचाय, पुढचे 7 तास.... फायनलपूर्वी अमोल मुझुमदारांनी टीम इंडियात विजयाची आग कशी जागृत केली?
फायनलपूर्वी अमोल मुझुमदारांचं प्रेरणादायी भाषण, पुढचे 7 तास... आपण स्वत:चा इतिहास घडवायचाय
Maharashtra Election: विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेण्याच्या तयारीत, निवडणूक आयोग महत्त्वाची घोषणा करण्याच्या तयारीत
विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेणार?
सावधान! पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, कुठे अलर्ट ?
सावधान! पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, कुठे अलर्ट ?
Salman Khan Shirtless Look: 59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हार्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs
59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हार्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs
Mhada Home: पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी! 90 लाखाचं घर मिळणार फक्त 28 लाखात! कुठे आणि कसा अर्ज करायचा?
पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी! 90 लाखाचं घर मिळणार फक्त 28 लाखात! कुठे आणि कसा अर्ज करायचा?
चोरीला गेलेला बैल हवाय?  जन्माचा दाखला द्या .. पोलिसांच्या अजब प्रश्नाने मालक चक्रावला, चोरट्याचं  CCTVही आलं, नेमका प्रकार काय?
चोरीला गेलेला बैल हवाय? जन्माचा दाखला द्या .. पोलिसांच्या अजब प्रश्नाने मालक चक्रावला, चोरट्याचं CCTVही आलं, नेमका प्रकार काय?
Embed widget