एक्स्प्लोर

Sonali Gurav: इन्स्टा रील स्टार सोनालीने पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार;; मॉर्फ व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल

Sonali Gurav: इन्स्टा रील स्टार सोनाली गुरवने मॉर्फ व्हिडीओविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मॉर्फ व्हिडीओमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला असल्याचे तिने म्हटले.

Sonali Gurav:  सोशल मीडियावर रील स्टार असलेल्या सोनाली गुरवने (Sonali Gurav) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपला चेहरा मॉर्फ करून अश्लील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असल्याची तक्रार सोनालीने केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर (Police FIR) दाखल केला आहे. मॉर्फ होत असलेल्या व्हिडीओमुळे प्रचंड धक्का बसला असल्याचे सोनालीने म्हटले आहे. याबाबतची तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. पोलिसात तक्रार करण्यासाठी दाखवलेल्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले आहे. 

सोशल मीडियावर सोनाली गुरव चांगलीच लोकप्रिय आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून तिचे रील्स, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तरुणाईशी कनेक्ट असणारा कंटेट असल्याने ती अल्पवधीतच लोकप्रिय झाली. तिच्या नव्या रील्सची तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते. मात्र, रविवारी तिने केलेल्या एका पोस्टमुळे अनेकांना धक्का बसला. या पोस्टमध्ये तिने पोलीस एफआयआरची कॉपी पोस्ट करत झालेला प्रकार लोकांसमोर मांडला. . एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. काही मित्रांचा फोन आला कि एक अश्लील मॉर्फ विडीओ सध्या वायरल होतोय. पायाखालची जमीन सरकली. पटकन सगळं सोडून कुठेतरी निघुन जावसं वाटलं. वाईट वाईट विचार येऊ लागले. हि घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या. सगळं काही छान सुरु असताना एखाद वादळ येऊन सगळं उध्वस्त करून जातं. अगदी तसच वाटलं, असे सोनालीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 

अन् बळ मिळाले...

सोनालीने म्हटले की,  ही अशी वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते आणि मग तेव्हा आपण असेच व्यक्त होणार आहोत का?  काही दिवस घाबरत कसेबसे दिवस ढकलू लागले पण नंतर घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणीनी मानसिक बळ दिलं आणि मी पोलीस स्टेशन गाठलं. कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीच चढू नये असं मला नेहमी वाटतं. पण, त्याउलट पोलिसात गेल्या गेल्या पोलिसांनी मला सहकार्य केलं आणि लगेच हालचाली सुरु झाल्या. पोलीस झपाट्याने हे कृत्य करणाऱ्याना आणि ते पसरवायला मदत करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत, असेही तिने म्हटले.

एवढी विकृती येते कुठून?

सोनालीने आपल्या पोस्टमध्ये समाजात पसरत असलेल्या विकृतीबाबतही भाष्य केले. आपला समाज एवढा विकृत कसा काय झाला? कुठून येते हि विकृती असा सवालही तिने केला. 16-17 वर्षाची लहान मुलंदेखील अश्लील कमेंट्स, मेसेज करतात तेव्हा चीड येते. स्वतःच्याच समाजात वावरण्याची भीती वाटते  असेही तिने म्हटले. 

View this post on Instagram
 
A post shared by 𝚂𝚘𝚗𝚊𝚕𝚎𝚎𝚎🦩 (@sonaleee13)

पोलिसांकडून गुन्हा दाखल

सोनाली गुरवने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम 500, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 65, 66 C, 67 A या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget