गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची 'मी पण गांधी' पदयात्रा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
INDIA Alliance March: पोलिसांकडून कांग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Mumbai INDIA Alliance March: आज गांधी जयंती (Gandhi Jayanti), याचनिमित्तानं मुंबईत (Mumbai) इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी जमलेले कार्यकर्त आणि पोलिसांची बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांकडून कांग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, जमावबंदीचे आदेश लागू असल्याचं सांगत पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकडही करण्यात आली.
दक्षिण मुंबईतील काँग्रेस कार्यालयाच्या इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सुरू झाल्यानंतर कार्यकर्ते मात्र काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, इंडिया आघाडीच्या पदयात्रेसाठी या मोर्चासाठी वर्षा गायकवाड, सचिन अहिर उपस्थित होते.
आज गांधी जयंती निमित्त I.N.D.I.A. आघाडीची 'मी पण गांधी' पदयात्रा काढण्यात आली. पण, या पदयात्रेच्या वेळी काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. पदयात्रेसाठी जमलेले कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याचं पाहायला मिळालं.
असा ठरलेला मार्ग
आज 2 ऑक्टोबर रोजी पदयात्रा काढण्याची वेळ ठरली होती. ही पदयात्रा मेट्रो सिनेमा - फॅशन स्ट्रीट - हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा पदयात्रेचा मार्ग ठरला होता. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ I.N.D.I.A. आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या स्मृतिंना वंदन करणार होते.
इंडिया आघाडीच्या पदयात्रेचा मार्ग ठरला होता. परंतु, रिगल सिनेमा येथून रॅली सुरु करा, असं पोलिसांचं म्हणणं होतं. त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
पाहा व्हिडीओ : I.N.D.I.A Rally Mumbai : इंडिया आघाडीची पदयात्रा, पोलिसांसोबत बाचाबाची, कार्यकर्त्यांची धरपकड
महत्त्वाच्या इतर बातम्या :
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आग्रही; शिंदे गटाचा 'प्लॅन बी' काय?