I.N.D.I.A Mumbai Meeting LIVE Updates : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा दुसरा दिवस, विविध मुद्द्यांवर चर्चा होणार
I.N.D.I.A Mumbai Meet : मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे.
LIVE
Background
I.N.D.I.A Alliance : मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावरही चर्चा होईल. दरम्यान इंडिया आघाडीचा लोगो अनावरण लांबणीवर पडलं आहे. गुरुवारी (31 ऑगस्ट) संध्याकाळी सर्व 28 पक्षांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनावर चर्चा झाली
विरोधकांच्या इंडिया आघाडीची (I.N.D.I.A) 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे.
देशभरातून येणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आली आहे. ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार आहे. पार्लेश्वर ढोल पथक मुलींची लेझीम पथक ग्रॅण्ड हयात इथे सर्व नेत्यांचे स्वागत करतील. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात मध्ये उपस्थित राहतील. साडेसहा वाजता इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल. तर आठ वाजता उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलां आहे. डिनरमध्ये खास महाराष्ट्रीयन मेन्यू ठेवण्यात आला आहे.
'इंडिया'ची ताकद वाढली
या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत 26 राजकीय पक्षांचा समावेश होता, आता ती संख्या 28 इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रातील डाव पीडब्लूपी(PWP) आणि आणखी एक प्रादेशिक पक्ष इंडियामध्ये सामील झाले आहेत. 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
'या' मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती, जागावाटपाचा फॉर्म्युला, लोगो आणि किमान समान कार्यक्रम यावर या बैठकीत चर्चा होणार आहे." दरम्यान इंडिया आघाडीच्या निमंत्रक व समन्वय समितीच्या सदस्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
I.N.D.I.A. Meeting Live: संसदेच्या विशेष अधिवेशनावरुनही खर्गेंचा मोदींवर निशाणा
I.N.D.I.A. Meeting Live: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले? हे आम्हाला माहीत नाही. मणिपूर जळत असताना विशेष अधिवेशन बोलावले नव्हते, कोरोनाच्या वेळी लोक चिंतेत होते, तेव्हा नाही बोलावलं विशेष अधिवेशन, मग आता काय झाले? ते हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहेत.
I.N.D.I.A. Meeting Live: मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
I.N.D.I.A. Meeting Live: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बोलताना म्हणाले की, या बैठकीत सर्व नेत्यांनी सहकार्य केलं. केंद्र सरकारवर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी 100 रुपयांनी दर वाढवतात आणि दोन रुपयांनी कमी करतात.
I.N.D.I.A. Meeting Live: आमच्या एकतेनंच सत्ताधाऱ्यांमध्ये भिती निर्माण झालीये : उद्धव ठाकरे
शिवसेना (UBT) चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आमच्या एकतेमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. इंडिया आणखी मजबूत होतेय
I.N.D.I.A Mumbai Meet LIVE : मुंबईत इंडिया बैठकीचं आयोजन
I.N.D.I.A Mumbai Meet LIVE : मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी, सोनिया गांधी मुंबईत दाखल झाले आहेत.
50 खोके कुठून दिले सांगा, दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसटीला दहा कोटी दिले : आदित्य ठाकरे
I.N.D.I.A Mumbai Meet LIVE : "50 खोके कुठून दिले ते सांगा. दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटीला दहा कोटी दिले. स्वत:च्या कार्यक्रमाच्या खर्चावर बोला," अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत आरोपांना उत्तर दिलं आहे.