एक्स्प्लोर

शालेय शिक्षण विभागामार्फत जिओ टीव्ही वरील तीन चॅनेल व जिओ सावन वरील रेडिओ चॅनेलचं उद्घाटन

शालेय शिक्षण विभागामार्फत जिओ टीव्ही वरील तीन चॅनेल व जिओ सावन वरील रेडिओ चॅनेलचे उद्घाटन करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.

मुंबई : या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचविणे शक्य होईल यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. असे असताना विविध पर्यायाचा अवलंब शिक्षण विभाग करताना पाहायला मिळतंय. याचाच एक भाग म्हणून जिओ टीव्ही प्लॅटफॉर्म वर इयत्ता 12 वी सायन्स, इयत्ता 10 वी मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी जिओ ज्ञानगंगा हे तीन चॅनेल आजपासून सुरू करण्यात आले असून जिओ सावन हे रेडिओ चॅनेलवर 'आम्ही इंग्रजी शिकतो' (we learn english) या कार्यक्रमाचा सुद्धा आज उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थित व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे करण्यात आले.

कोरोनाच्या पार्शवभूमी शाळा बंद असल्या तरी राज्यातील मुलांचा शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके पोहचविण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात असून हे काम अंतिम टप्यात असल्याचं शिक्षण विभागाने सांगितले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्याकडून शैक्षणिक दिनदर्शिका देण्यात आली असून त्याद्वारे विद्यार्थी स्वयंअभ्यास करू शकणार आहेत.

पैठण येथील संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा प्रयत्न

रोज सहा तास तासिका प्रक्षेपित होणार या जिओ प्लॅटफॉर्मवरील तीन चॅनेलवर रोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील व इतर अठरा तास त्याचे पुनप्रक्षेपण केलं जाणार आहे. याचे वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर दिले जाईल. यासोबतच लवकर इतर 9 जिओ चॅनेल सुद्धा सुरू केले जाणार आहेत. यामध्ये इयत्ता 10 वी (उर्दू माध्यम), इयत्ता 9 वी (मराठी माध्यम) , इयत्ता 9 वी (इंग्रजी माध्यम), इयत्ता 9 वी (उर्दू माध्यम), इयत्ता 8 वी, 7वी आणि 6 वी (इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यम) व इयत्ता तिसरी-चौथी (इंग्रजी, उर्दू, मराठी) चॅनेल लवकरच सुरू केले जाणार आहे.

इयत्ता निहाय 24 तास चॅनेल यावेळी शिक्षणमंत्री म्हणाल्या, 'हे इयत्ता निहाय चॅनेल 24 तास सुरू राहतील सध्या राज्यातील 4.3 कोटी लोकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहे, त्यात ते जिओ टीव्हीद्वारे या तासिकातुन अभ्यास करू शकतील. शिवाय, इतर मोबाइल धारकांसाठी जिओ चॅट अॅपद्वारे इयत्ता निहाय ई साहित्य मोबाइलमध्ये उपलब्द करुन देण्याचे नियोजन शिक्षण विभागाचे आहे'. शिवाय जिओ सावन अॅपवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलकी पुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

School Fee | शाळांच्या नियमित फी आकारणीवर पालकांचा आक्षेप; यंदा फक्त ट्युशन फी घ्या, पालकांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget