एक्स्प्लोर

Coastal Road Inauguration: कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारीला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 किलोमीटर मार्गाचं लोकार्पण

Inauguration of Coastal Road: 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते वरळी ते मरीन ड्राईव्ह या 10 किलोमीटर मार्गाचं लोकार्पण

Coastal Road Inauguration of First Phase : मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या कोस्टल रोडच्या (Coastal Road) पहिल्या फेजचं उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते कोस्टल रोडचं (Coastal Road) उद्घाटन होणार आहे. वरळी (Worli) ते मरीन ड्राईव्ह (Marine Drive) या 10 किलोमिटर रस्त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. तसेच, 15 मेपर्यंत दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली आहे. 

मुंबईसाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प

मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे. 

कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्ट्य 

सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे 1600 वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यकरण आणि इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे. 

भराव टाकण्यात आलेल्या जागेवर मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी या ठिकाणी सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक उद्याने आणि ओपन थिएटर हे सर्व छोटे मोठे प्रकल्प प्रस्तावित असतील. शिवाय मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचं अंतर जिथे एक तास लागतो तिथे कोस्टल रोड प्रकल्पामुळे दहा मिनिटात हे अंतर पार होईल. 

कसा असेल मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?

  • मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे. 
  • प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे. 
  • एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
  • यामध्ये 15.66 किमी चे  तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
  • कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
कारची तीन दुचाकीस्वरांना धडक, एकाचा जागीच मृत्यू, मुंबईतील विलेपार्लेत भीषण अपघात
कारची तीन दुचाकीस्वरांना धडक, एकाचा जागीच मृत्यू, मुंबईतील विलेपार्लेत भीषण अपघात
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget