एक्स्प्लोर
येत्या ४८ तासात मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईत मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस पाऊस हजेरी लावत असताना आता पुढचे 48 तास पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

फाईल फोटो
मुंबई : मागील दोन दिवसांपासून पावसानं रात्रीच्या वेळेस मुंबईला झोडपलं असताना येत्या 48 तासांत मुंबईत धो-धो पाऊस बरसणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.
दोन दिवस झालेल्या सलग पावसामुळे वातावरणातल्या कमाल आणि किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली आहे. तापमानात झालेल्या घसरणीमुळे मुंबईकरांना सप्टेंबर हीटपासून दिलासा मिळाला आहे.
तर राज्यात आजपासून पुढील 4 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























