एक्स्प्लोर

Mumbai Vaccination : मुंबईतील लसीकरणाबाबत महत्वाची बातमी! गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला...

मुंबईतील लसीकरणाबाबत महत्वाची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला आहे. जून महिन्यात जवळपास 6 लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे.

मुंबई : मुंबईतील कोरोनाचं प्रमाण काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून मुंबईत एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आल्याचं दिसून येत आहे. मुंबईत लसीकरणावर देखील जोर दिला जात आहे. लसीकरणाबाबत (Mumbai Vaccination) महत्वाची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी (BMC Suresh Kakani) यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला आहे. जून महिन्यात जवळपास 6 लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे. प्रत्येक सेंटरवर 300 लसी दिल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. 

ते म्हणाले की, मुंबईत गर्दीचं नियोजन करता यावं याकरता 18 ते 44 वयोगटामध्ये दोन उपगट करण्यात आलेत. यांपैकी राज्याच्या संमतीनं 30 ते 44 च्या वयोगटाचं लसीकरण सुरु झालं आहे. मुंबईत 18 ते 44 वयोगटात 50 लाख लोकसंख्या आहे.पुढचा एक आठवडा 2 उपगटांनुसार लसीकरण प्रक्रीयेचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा नवं नियोजन करणार आहोत, असं ककाणी यांनी सांगितलं. 

ककाणी यांनी सांगितलं की, गेल्या 3 महिन्यांत एप्रिल- 8 लाख 70 हजार, मे-  4 लाख 57 हजार,  जून- आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त मुंबईला लसपुरवठा झाला आहे. 75 % लससाठ्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. ज्याकडून मुंबई महापालिकेला लस साठा मिळतो. लस  साठा वाढल्यास अधिक लस केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. 

कांदिवलीतील बनावट लसीकरण प्रकरणाबाबत ते म्हणाले की, यासंदर्भात सीरम इन्स्टिट्युटला महापालिकेकडून बॅच क्रमांकांच्या तपासणीबाबत पत्र दिले होते. सीरमकडून उद्यापर्यंत प्रतिसाद अपेक्षित आहे. पोलिस तपास या प्रतिसादानुसार केला जाऊ शकेल, असं ककाणी यांनी सांगितलं. 

स्वाईन फ्लु केसेससंदर्भात बोलताना ककाणी म्हणाले की, एच1 एन 1 गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या केसेस कमी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी 50 टक्केपेक्षा कमी केसेस समोर आल्या आहेत.  

डेल्टा व्हेरीएंट बोलताना त्यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये डेल्टाचे रुग्ण नाहीत. मात्र, मुंबईजवळील इतर जिल्ह्यांमध्ये काही रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. प्रत्येक आठवड्यात डेल्टा व्हेरिअंटसाठी 50 सॅम्पल चेक केले जात असल्याचं ककाणी यांनी सांगितलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget