एक्स्प्लोर
मला माहितीये, तुम्ही आता सोबत आहात, पूनम महाजनांचं ट्वीट
अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोक राजधानी दिल्लीत गेले होते. तर ज्यांना शक्य नाही अशा प्रत्येकाने आपापल्या शब्दांमध्ये अटलजींना श्रद्धांजली वाहिली.

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान आणि थोर कवी, उत्तम पत्रकार असं बहुआयामी व्यक्तीमत्व, कठोर, कणखर, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा नेता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आज आपल्याला कायमचे सोडून गेले.. दिल्लीतील स्मृतीस्थळावर वाजपेयींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोक राजधानी दिल्लीत गेले होते. तर ज्यांना शक्य नाही अशा प्रत्येकाने आपापल्या शब्दांमध्ये अटलजींना श्रद्धांजली वाहिली. भाजपच्या खासदार आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी वाहिलेली श्रद्धांजली ही खुप काही बोलणारी आहे. I know you are together now ! अशा एका वाक्यात पूनम महाजन यांनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आणि प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त जणांनी रिट्वीट केलं आहे, तर 26 हजार पेक्षा जास्त जणांनी फोटो लाईक केला आहे. प्रमोद महाजन आणि अटल बिहार वाजपेयी यांचं नातं नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रमोद महाजन भाजपचे महत्त्वाचे राष्ट्रीय नेते होते. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते. 2006 मध्ये प्रमोद महाजन यांची त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली आणि या देशाने एक मोठा नेता गमावला. त्यांच्यानंतर आज पुन्हा एकदा अटलजींच्या रुपाने देशाने एक मोठं व्यक्तीमत्व गमावलं.
I know you are together now ! pic.twitter.com/8zTsTZeNpA
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) August 17, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
बीड























