एक्स्प्लोर
भावजयीवरील प्रेमातून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप
मुंबई : विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नी बीनाच्या हत्ये प्रकरणी जितेंद्र देढियाला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
देढियाचा साथीदार नझीम खानलाही पुढचं आयुष्य तुरुंगाच्या चार भिंतीआड काढावं लागणार आहे. 2009 मध्ये घडलेल्या त्या हत्याकांडामुळे संपूर्ण मुंबई हादरली होती.
घटनेच्या दिवशी जितेंद्र देढिया पत्नी बीनासोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी जितेंद्र देढियानं साथीदार नझीन खानच्या मदतीनं पत्नी बिनाची हत्या केली. परळ परिसरात हा सगळा प्रकार घडला होता. सोनसाखळी चोरानं ही हत्या केलाचा बनाव जितेंद्रनं रचला होता.
मात्र पोलिस तपासात त्याचं बिंग फुटलं. पत्नीच्या भावजयीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं. तब्बल सात वर्षांनंतर या हत्या प्रकरणाचा खटला निकाली लागला आहे. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी जितेंद्र देढियाला आणि त्याला मदत केल्या प्रकरणी नझीम खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement