एक्स्प्लोर
मुंबईत आल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी कसं पोहोचाल?
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मराठा बांधवांना हार्बर लाईनने भायखळ्याला जावं लागेल, तर उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठी बांधवांना मध्य रेल्वेच्या ठाणे, कल्याण या स्टेशनांहून मोर्चाच्या ठिकाणी जाता येईल.
![मुंबईत आल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी कसं पोहोचाल? How To Go For Maratha Morcha Place Byculla Jijamata Udyan In Mumbai मुंबईत आल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी कसं पोहोचाल?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/08153152/MORCHA_RAILWAY_ROUT_WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यातील मराठा मोर्चाचं वादळ आता राज्याची राजधानी मुंबईत धडकलं आहे. राज्यभरातून मराठा बांधव या मोर्चासाठी येणार आहेत. मात्र वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानापासून मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी वाहन कुठेही पार्क केलं तरी भायखळ्याला पोहोचावं लागणार आहे.
मुंबईतील मराठा मोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि कोकणातून येणाऱ्या वाहनांमुळे मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते. ही गैरसोय टाळण्यासाठी नवी मुंबईत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर येणाऱ्या स्थानकांच्या बाहेर पार्किंग करून मोर्चेकऱ्यांना रेल्वेने मुंबईत जावं लागेल.
वाहनाने मुंबईला आल्यास वाहन नवी मुंबईतील स्टेशनांबाहेर पार्क करावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळं स्थानक देण्यात आलेलं आहे. त्यानुसार वाहन पार्क करुन मोर्चाच्या ठिकाणी यावं लागेल.
जिल्हानिहाय पार्किंग व्यवस्था
- सातारा, सांगली, कोल्हापूर - वाशी एपीएमसी मार्केट
- पुणे , सोलापूर - खारघर रेल्वे स्थानक, सेंट्रल पार्क मैदान
- अहमदनगर - खांदेश्वर रेल्वे स्थानक
- औरंगाबाद – मानसरोवर (कामोठे) रेल्वे स्थानक
- रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग - नेरुळ , सीवूड्स रेल्वे स्थानक, तांडेल मैदान
- बीड - सानपाडा रेल्वे स्थानक, दत्त मैदान
- परभणी जिल्हा - वाशी रेल्वे स्थानक, महाराष्ट्र सदन
मुंबईत मराठा मोर्चाला येताना तुमचं वाहन इथे पार्क करा!
मुंबई मराठा मोर्चा: तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)