एक्स्प्लोर

'रिमोट कंट्रोल' कसा बनला राजकीय शब्द? पहिल्यांदा कोणी वापरला होता?

सध्याच्या राजकारणात रिमोट कंट्रोल हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो. बाळासाहेबांपासून सोनिया गांधी तसंच शरद पवार यांच्याकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल असल्याचं बोललं गेलं. पण रिमोट कंट्रोल या शब्दाला राजकारणात एवढं महत्त्व कधीपासून मिळायला लागलं?

मुंबई : रिमोट कंट्रोल हे टीव्ही किंवा इतर उपकरणं चालवण्याचं छोटं यंत्र आहे, पण भारतीय राजकारणात मागील अडीच दशकांपासून या शब्दाचा सर्रास वापर होत आहे. या शब्दाचा वापर नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात नाही. पवार फक्त सरकारचे मार्गदर्शक आहेत." ज्याप्रकारे रिमोट कंट्रोलचा वापर टीव्ही चालू-बंद करण्यासाठी, चॅनल बदलण्यासाठी होतो, त्याचप्रकारे काही राजकीय नेते सरकारच्या बाहेर राहूनही सरकार नियंत्रणात ठेवतात. आपल्या अदृश्य रिमोटद्वारे त्यांनी कधी मंत्र्यांना बदललं तर कधी मुख्यमंत्री, कधी सरकारला काही निर्णय घेण्यास भाग पाडलं तर काही निर्णय थांबवले. सरकार कोणत्या मुद्द्यावर कोणती भूमिका घेणार, याचा निर्णय रिमोट कंट्रोल ज्या नेत्याच्या हातात आहे तोच ठरवतो. पहिल्यांदा वापर कोणी आणि कधी केला? या शब्दाचा पहिला वापर 1995 मध्ये झाला होता. त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं होतं. ज्यावेळी शिवसेनेकडून मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं, तेव्हा पत्रकारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं होतं की, "तुम्ही सत्तेचा भाग का नाही?" यावर बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं की, "सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात राहिल." याचा अर्थ स्पष्ट होता की, सरकारचा चेहरा मनोहर जोशी असले तरी सरकारची खरी ताकद बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होती. बाळासाहेबांनी शपथ घेतली होती की ते ना कधी निवडणूक लढणार ना कधी सत्तेचं कोणतंही पद स्वीकारणार. बाळासाहेबांनी आपल्याजवळील रिमोट कंट्रोलचा पुरेपूर वापरही केला. सरकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्याच सांगण्यावरुन घेण्यात आले. 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा त्यांनी रिमोटचं बटण दाबलं तेव्हा मनोहर जोशी यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्याजागी नारायण राणे यांना बसवलं. मात्र त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातून रिमोट कंट्रोल निसटला आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. मुख्यमंत्री काँग्रेसचा, सरकारमध्ये वजन मात्र शरद पवारांचं 2004 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे आला. मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं खरं पण वजन मात्र शरद पवारांचंच होतं. यामागे कारण असं होतं की, काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकूनही शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली. तेव्हा काँग्रेसने 69 तर राष्ट्रवादीने 71 जागा जिंकल्या होत्या. केंद्रातही रिमोट कंट्रोल शब्दाचा वापर रिमोट कंट्रोल शब्दाचा वापर केंद्र सरकारसाठीही झाला. 2004 मध्ये जेव्हा यूपीएची सत्ता आली, तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधानपद नाकारुन डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपदी बसवलं. त्यानंतर पुढील दहा वर्षांपर्यंत म्हणजेच 2014 पर्यंत केंद्र सरकारचा रिमोट कंट्रोल सोनिया आणि राहुल गांधी यांच्या हातात होता, असं म्हटलं गेलं. सरकारचा रिमोट पवारांच्या हाती नाही, ते मार्गदर्शक : उद्धव ठाकरे 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जे सत्तेचं नाटक झालं, त्याचे सूत्रधार शरद पवार असल्याचं म्हटलं जातं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हातात आहे आणि 1995 पासून 1999 पर्यंत ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी सरकार  नियंत्रणात ठेवलं होतं, तसंच शरद पवार आता करत आहेत, अशीही चर्चा आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. शरद पवार केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत, असा दावा त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Free School Bag: आनंदवार्ता! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget