एक्स्प्लोर
घाटकोपरमध्ये सैराट : पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीची बापाकडून गळा चिरुन हत्या
मुंबईमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे.
मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. रविवारी सकाळी घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर गळा चिरलेल्या अवस्थेत मीनाक्षी चौरसिया या तरुणीचा मृतदेह आढळला होता. या तरुणीचे वडील राजकुमार चौरसिया यांनीच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.
4 महिन्यांपूर्वी मीनाक्षीने वडिलांच्या मनाविरुद्ध घाटकोपरमधील ब्रिजेश चौरसिया नावाच्या एका तरुणासोबत पळून जाऊन विवाह केला होता. मीनाक्षीच्या वडिलांना या गोष्टीचा खूप राग आला होता. मीनाक्षीच्या वडिलांनी तिचे दोनवेळा लग्न ठरवले होते. परंतु त्याला मीनाक्षीने विरोध केला. लग्न मोडून मीनाक्षी ब्रिजेश चौरसियासोबत पळून गेली.
आंतरजातीय विवाहामुळे बापाने मुलीसह जावयाला पेटवलं | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे आपली प्रचंड बदनामी होत आहे, असे तिचे वडील राजकुमार चौरसिया यांचे म्हणणे होते. त्यातच मीनाक्षीने गावी जाण्याचा बेत आखला होता. मीनाक्षी नवऱ्यासोबत गावी गेली तर गावाकडेदेखील आपली बदनामी होईल, या रागातून राजकुमार चौरसिया यांनी तिची हत्या करुन प्रकरण मिटवण्याचे ठरवले.
आंतरजतीय विवाहांमुळे देशभरात झालेले हल्ले
राजकुमार चौरसिया यांनी शनिवारी रात्री मीनाक्षीला एलबीएस मार्गावर बोलावले. तिथे त्यांनी मीनाक्षीचा गळा चिरुन तिची हत्या केली. घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी राजकुमार चौरसियाला बेड्या ठोकल्या आहेत.
मंगळवेढ्यात 'सैराट' सत्यात उतरला? | स्पेशल रिपोर्ट | सोलापूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement