एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Police Recruitment Hi-Tech Copy : मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेत हायटेक कॉपी, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेचा आरोप

Mumbai Police Recruitment Hi-Tech Copy : मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा 7 मे रोजी मुंबईतील विविध केंद्रांवर पार पडली. मात्र याच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार घडल्याचं समोर येत आहे.

Mumbai Police Recruitment Hi-Tech Copy : मुंबई पोलीस भरती (Mumbai Police Recruitment) लेखी परीक्षा (Written Exam) 7 मे रोजी मुंबईतील (Mumbai) विविध केंद्रांवर पार पडली. मात्र याच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार घडल्याचं समोर येत आहे. या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉपी (Hi-Tech Copy) करुन शेकडो विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने (Competitive Examination Coordinating Committee Organization) केला आहे.

या सगळ्या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गंभीर दखल घेत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेकडे असलेले अधिकचे पुरावे पुढील तपासासाठी मागितले आहेत. परीक्षेच्या दिवशी कॉपी करणाऱ्या काही उमेदवारांविरोधात मुंबई पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाणे आणि भांडुप पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. मात्र या कॉपी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं आता समोर येत आहे.

कशी झाली हायटेक कॉपी?

7 मे रोजी मुंबई पोलीस भरतीमधील शिपाई पदाच्या 7076 जागांसाठी मुंबईत एकूण 213 केंद्रांवर लेखी परीक्षा झाली होती. एकूण 78 हजार 522 परीक्षार्थी या परीक्षेला उपस्थित होते. तर या परीक्षेकरता एकूण 1246 पोलीस अधिकारी आणि 5975 अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु याच परीक्षेदरम्यान हायटेक कॉपी झाल्याचा आरोप होत आहे.

उमेदवारांनी बटन कॅमेऱ्याचा वापर करुन प्रश्नपत्रिकेचे फोटो ई-मेलद्वारे परीक्षा केंद्राबाहेर पाठवले. त्याची उत्तरं अवघ्या काही मिनिटात केंद्राबाहेरील शिक्षकांच्या मदतीने काढून मायक्रोहेडफोनची मदत घेऊन लिहिली, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आला आहे.

या कॅमेऱ्याद्वारे काढले गेलेल्या प्रश्नपत्रिकांचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. शिवाय या परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाली असून मुंबई पोलिसांनी यासंबंधी तातडीने कारवाई करुन या गैरप्रकारामागे असलेल्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने यापूर्वी बाहेर काढलेले घोटाळे 

दरम्यान याच स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने आरोग्य भरती, म्हाडा आणि टीईटी परीक्षा गैरप्रकार समोर आणून राज्यातील होणाऱ्या परीक्षांचा घोटाळा बाहेर काढला होता.

VIDEO: Mumbai Police Bharti : मुंबई पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी? स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेचा आरोप

हेही वाचा

Police Recruitment : मुंबई पोलीस भरतीत गैरप्रकार समोर, धावण्याच्या शर्यतीत चिपची अदलाबदल; आतापर्यंत 16 उमेदवारांविरोधात गुन्हे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Embed widget