एक्स्प्लोर

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला हायकोर्टाची सशर्त परवानगी

मुंबई : गुढीपाडव्याला शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मनसेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मनसेला सभा घेण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.   बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सायलेंट झोनमध्ये सभा घेण्यास परवानगी कशी दिली असा सवाल सरकारला विचारला, ज्याच्यावर सरकारी पक्षाकडे काहीच उत्तर नव्हतं. त्यानंतर झालेल्या सुनावणीत अखेर कोर्टानेच मनसेला सभेसाठी सशर्त परवानगी दिली.   सभेदरम्यान ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाजी पार्क मैदान निवासी क्षेत्र असल्याने मनसेलाही 55 डेसिबलमध्ये मेळावा साजरा करावा लागेल. कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन झाल्यास मनसेवर कारवाई करण्याचेही आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.     शिवाजी पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यालाही आवाजाचे निर्बंध घाला, अशी मागणी वेकॉम ट्रस्टने सोमवारी मुंबई हायकोर्टात केली होती. त्याची दखल घेत कोर्टाने या मागणीसाठी रितसर अर्ज करण्याचे निर्देश दिले.     याच मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला न्यायालयाने वेळोवेळी आवाजाचे निर्बंध पाळण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हाही नोंदवला होता. आता मनसेही यंदाच्या गुढी पाडव्यापासून मेळाव्याची गुढी याच मैदानात उभारणार आहे. न्यायालयाने मनसेला आवाजाचे निर्बंध घातल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचे पालन करणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.     हे मैदान शांतता क्षेत्र घोषित करावे, या मागणीसाठी वेकॉमने न्यायालयात याचिका केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने 26 जानेवारी, 1 मे व 6 डिसेंबर हे दिवस वगळून या मैदानावर कोणत्याच कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, असे आदेश शासन व महापालिकेला दिले. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेला न्यायालयाचे दार ठोठवावे लागत होते.   अखेर गेल्यावर्षी राज्य शासनाने शिवाजी पार्क मैदानावर परवानगी दिल्या जाणाऱ्या यादीत शिवसेनेचा दसरा मेळावा व मनसेचा गुढी पाढवा मेळावा यांचा समावेश केला. परिणामी मनसेला मेळाव्यासाठी न्यायालयात यावे लागले नाही. 2017 मधील पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला नवसंजीवनी देण्यासाठी पाडवा मेळावा महत्त्वपूर्ण ठरु शकतो.  

संबंधित बातम्या :

 

शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्याला परवानगी कशी?: हायकोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget