चंद्रशेखर आझादांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयाचा नकार
पुणे विद्यापीठात चंद्रशेखर आज विद्यापीठातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चर्चा करणार होते. चंद्रशेखर भीमा-कोरेगाव येथे अभिवादन करण्यास जाऊ शकतात असंही उच्च न्यायचालयानं स्पष्ट केलं आहे.

मुंबई : भीम आर्मीचे प्रमुखे चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. पुणे विद्यापीठाने परवानगी न दिल्याने उच्च न्यायालयानेही सभेला परवानगी देण्यास नकार दिला. कालच पुणे पोलीस प्रशासनानेही चंद्रशेखर यांना पुण्यात सभा घेण्यास परवानगी नाकारली होती.
चंद्रशेखर यांना अटक किंवा ताब्यात घेतलेलं नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. चंद्रशेखर आज पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. चंद्रशेखर भीमा-कोरेगाव येथे अभिवादन करण्यास जाऊ शकतात असंही उच्च न्यायचालयानं स्पष्ट केलं आहे.
पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर भीम आर्मीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
Before You Go
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर





















