एक्स्प्लोर
दिघ्यातील 'त्या' 4 अनधिकृत इमारतींवर हातोडा चालणारच!
मुंबई : दिघावासियांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे आज दिघ्यातील अमृतधाम, अवधूत छाया, दुर्गामाता प्लाझा आणि दत्तकृपा या चार इमारतीतील रहिवाशांना आपली घरं खाली करावी लागणार आहेत.
दिघ्यातील सिडकोच्या जमिनीवर असलेल्या अमृतधाम, अवधूत छाया, दत्तकृपा आणि दुर्गामाता प्लाझा या चार इमारतींना जागा खाली करण्याची नोटीस सप्टेंबर 2016 मध्ये पाठवण्यात आली होती. त्यामुळे याला स्थगिती मिळावी, यासाठी या चारही इमारतीतील रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.
पण हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावत, इमारती खाली करून कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज या इमारतीतल्या सर्व रहिवाशांना आपली घरं खाली करावी लागणार आहेत.
दरम्यान, हायकोर्टाने यापूर्वीच दिघ्यातील सिडको आणि एमआयडीसीच्या भूखंडावरील 99 बेकायदेशीर इमारती पाडण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. या कारवाईविरोधात दिघ्यातील रहिवाशांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण हा विषय शासनाचा असून याबद्दलचा निर्णयही शासनाने घ्यावा, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे दिघ्यातील अनाधिकृत बांधकामांविरोधात शासनाची कारवाई सुरुच राहणार आहे.
संबंधित बातम्या :
दिघ्यातील चार इमारतींना जागा खाली करण्याच्या नोटिसा
दिघावासियांना चिथावणाऱ्या नेत्यांची नावं मुंबई हायकोर्टाने मागवली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement