एक्स्प्लोर

आमदार रमेश कदम यांना हायकोर्टाकडून तात्पुरता जामीन मंजूर, अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रमेश कदमांसह एकूण 12 जणांना अटक झाली. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं.

मुंबई : आमदार रमेश कदम यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 ते 6 ऑक्टोबरपर्यंत त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयार करणाऱ्या रमेश कदमांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 2015 मध्ये आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अटक झाल्यापासून रमेश कदम जेलमध्ये आहेत. मात्र दरम्यानच्या काळात कदम हे सतत निरनिराळ्या वादांमुळे चर्चेत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांना ईडी कोर्टाकडून याआधीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याविरोधात राज्य सीआयडीने दाखल केलेलं प्रकरण प्रलंबित असल्याने कदम जेलमध्येच होते. त्यासाठी यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रमेश कदमांसह एकूण 12 जणांना अटक झाली. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं. डिसेंबर 2018 मध्ये कारागृहातील असभ्य वर्तन आणि संबंधित खटल्यातील साक्षीदारांचं संरक्षण या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाने रमेश कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र या प्रकरणी पोलीस तपासात जाणूनबुजून दिरंगाई करत असल्याचा आरोप कदमांच्यावतीने करण्यात आला. VIDEO | काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळाचा महाघोटाळा? दरम्याच्या काळात अनेक कारणाने रमेश कदम सतत चर्चेत राहिले. एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं, त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना मंजुळा शेट्ये प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते. याशिवाय पोलीस बंदोबस्तात विधानभवनात आलेल्या कदमांनी जाहीरपणे भाजपला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं होतं. संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget