एक्स्प्लोर
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पावसानं झोडपलं!
दिवाळीचा आज पहिला दिवा लागला, तरी मुंबईसह उपनगरात पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे.
![दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पावसानं झोडपलं! Heavy Rain In Mumbai And Suburban Areas Latest Update दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पावसानं झोडपलं!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/16232426/mumbai-rain.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दिवाळीचा आज पहिला दिवा लागला, तरी मुंबईसह उपनगरात पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
ठाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. तर मुलुंडच्या एलबीएस रोडवर पाणी साचलंय.
याशिवाय मुंबईलाही पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबईच्या चेंबूर, घाटकोपर, भांडुमध्ये देखील वीजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. गोरेगावमध्ये वाहनांवर झाड कोसळल्याची घटना घडली.
दरम्यान, मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेवरील शहाडजवळ वाढदिवसाचं बॅनर वादळी पावसामुळे ओव्हरहेड वायरवर पडलं. हे बॅनर पडल्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला.
त्यामुळे गेल्या एक तासापासून मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या अनेक लोकल खोळंबल्या आहेत. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सध्या एका रांगेत उभ्या आहेत. तर टिटवाळा आणि आसनगाव लोकल कल्याण स्थानकात रद्द करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
बीड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)