एक्स्प्लोर

मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर एका रुपयात आरोग्य सेवा

मुंबई : मुंबईतील रेल्वेस्थानकांशेजारी आता एका रुपायात आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ‘मँजीकडील’ या आरोग्य सेवा देणाऱ्या कंपनीने मध्य रेल्वेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु केला आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील 19 रेल्वेस्थानकांवर हा उपक्रम सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जागा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड या स्थानकांवर ही रुग्णालयं सुरु करण्यात आली आहेत. काही दिवसांतच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटनही करण्यात येणार आहे. मात्र, उद्घाटनाआधीच रुग्णांची या रुग्णालयांबाहेर रांग लागली आहे. या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांकडून अवघ्या एका रुपयात आजाराचे निदान आणि सल्ला घेणं शक्य होणार असून, तातडीची आरोग्यसेवाही या ठिकाणी मोफत देण्यात येईल. इसिजी, ब्लड शुगर तपासणी, नेबोलायझर ट्रिटमेंट, सर्व प्रकारचे ड्रेसिंग, रक्तदाब तपासणी, सलाईन या आरोग्य सेवा केवळ 50 ते 100 रुपयांत दिल्या जात आहेत. त्याचसोबत 10 ते 20 टक्के स्वस्त दराने औषधे मिळण्याची सोयही या आरोग्य सेवा केंद्रात असणाऱ्या मेडिकलद्वारे उपलब्ध करुन दिली जात आहे. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना या सेवेमुळे तातडीची सेवा मिळणं शक्य होईल. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीयांनाही या सुविधेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक आरोग्यकेंद्रावर 3 एमबीबीएस डॉक्टर, दोन ते तीन व्हिजिटिंग एमडी डॉक्टर उपलब्ध असतील. स्टेशनवर असणारी ही आरोग्य केंद्रं आणि मेडिकल 24 तास सेवा देणार आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमातील डॉक्टरांमध्ये तरुणांचा सहभाग मोठा आहे. रेल्वेनं मोफत उपलब्ध करुन दिलेल्या जागेमुळे आणि रेल्वेस्थानकावरच असणाऱ्या कमी दरात औषधविक्री करणाऱ्या मेडिकलमुळे ‘मँजीकडील’ या कंपनीला अवघ्या एक रुपयात आरोग्य सेवा देणे शक्य झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget