एक्स्प्लोर

कोणी दांडक्याने मारलं, कोणी अंगावर सुतळी बॉम्ब फेकले, आता ओंकार हत्तीला वनताराला नेणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं हा निर्णय दिला आहे. समिती नेमण्याची देखील सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे ओंकार हत्तीला वनतारामध्ये सोडण्याच्या हालचाली आणखी गतिमान होणार आहेत.

Omkar Elephant: महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्याच्या सीमेवर धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारामध्ये नेलं जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं हा निर्णय दिला आहे. समिती नेमण्याची देखील सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे ओंकार हत्तीला वनतारामध्ये सोडण्याच्या हालचाली आणखी गतिमान होणार आहेत. मात्र, ओंकार हत्तीचा नैसर्गिक अधिवास बदलणे धोक्याचे ठरू शकते, असा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील सीमेजवळ फिरत असलेल्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीबाबत प्रा. रोहित कांबळे यांनी 9 ऑक्टोबर 2025 रोजी सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली होती. प्रा. कांबळे, अ‍ॅड. उदय वाडकर, अ‍ॅड. केदार लाड यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. टी. जे. कापरे यांनी बाजू मांडली. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट 1972 नुसार एखाद्या हत्तीने मानवाच्या जीवितास धोका निर्माण केला किंवा हत्ती स्वतः आजारी असेल, तर नागपूरमधील मुख्य वनसंरक्षक यांच्या अहवालानुसार, एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे हलवू शकतात. ‘ओंकार’ हत्ती दोडामार्ग परिसरात मानवी वस्तीत घुसल्याने त्याला पकडून गुजरातमधील ‘वनतारा’मध्ये पाठविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याला प्रा. कांबळे यांनी जनहित याचिका दाखल करून हरकत घेतली होती.

प्रा. कांबळे, अ‍ॅड. वाडकर, अ‍ॅड. लाड यांनी कलम 12 नुसार हत्तीचा अधिवास बदलायचा असेल, तर केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते, ‘ओंकार’ हत्तीला कोल्हापूर वन विभागाच्या हद्दीतील नैसर्गिक अधिवासातच सोडा, कोल्हापूर वन विभागाच्या हद्दीतील आठ हत्तींचा यापूर्वी मृत्यू झाला असून, त्याची चौकशी व्हावी, ‘ओंकार’ हत्तीला पकडण्याची मोहीम थांबवा, तसेच ‘ओंकार’ हत्तीला चांदोली अभयारण्य, राधानगरी अभयारण्य, कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ— प्रकल्पात पाठवावे, अशी मागणी केली होती. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी ‘वनतारा’शिवाय इतरत्र व्यवस्था नाही, त्यामुळे ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’मध्येच पाठवा, असे सांगितले. सरकारी वकील कापरे यांचा युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायनिवाडे यानुसार ‘ओंकार’ हत्तीला तात्पुरते गुजरातमधील ‘वनतारा’मध्ये पाठवा, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.

इतर महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Nagpur MLC Election Result 2026: नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
Embed widget