एक्स्प्लोर

Sharad Pawar: 'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', गावातील तरुणानं साकडं घालताच शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं

ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याच्या घटना आता वारंवार कानावर पडू लागल्यात . ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिक गंभीर होत जाणारी . 

Akola: गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील विशेषतः शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या अनेक घटना कानावर पडतायत . सुशिक्षित मुलींना शेतकरी तरुणापेक्षा शहरातील नोकरदार मुलाला अधिक पसंती असल्याचं चित्र असताना ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणं अवघड होऊन बसलंय .  नुकतंच अकोल्यातील एका तरुणांनं  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून ' मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही ' असं साकडं घातल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आता कामाला लावलं आहे .

 महाराष्ट्रातील लग्नाळू तरुणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. डिसेंबर 2022 मध्ये सोलापूर मध्ये लग्नाळू तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. फेटा, मुंडावळ्या, वाजंत्री आणि घोड्यावर बसलेले 25 पेक्षा अधिक तरुण नवरी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते. तर नागपुरातही अधिवेशन काळात दोन वर्षांपूर्वी एका तरुणाने लग्न व्हावं, या प्रश्नावरून आंदोलन केलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

8 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार अकोल्यात आले होते . कान्हेरी सरपंच येथील शेतकरी संवाद कार्यक्रमानंतर एका 34 वर्षीय पठ्यानं शरद पवारांना लग्नासाठी पुढाकार घेण्याचं निवेदन दिलय .  या निवेदनाची सध्या एकच चर्चाय . एकीकडे वय वाढत जातंय . आता लग्न झालं नाही तर भविष्यात माझं लग्न होणार नाही. मी एकटाच राहील .माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही असं साकडे या तरुणांना घातल्याने शरद पवारांसह अनिल देशमुख आणि इतर नेते स्तब्ध झालेत . हे पत्र दुसऱ्या दिवशी मुंबईत शरद पवारांनी जयंत पाटलांसह आपल्या इतर नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दाखवलंय .या पत्रावर चर्चा झाली आहे . या तरुणासाठी जे करता येईल ते करा अशा सूचना शरद पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात .

तरुणाच्या निवेदनाची गंभीर दखल, पदाधिकाऱ्यांना लावलं कामाला

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अनिल देशमुख म्हणाले, "शरद पवार सर्व समस्यांवर उपाय शोधू शकतात, या अपेक्षनेच अकोल्यातील त्या तरुणाने शरद पवार यांच्याकडे आपल्या लग्नाविषयीची तक्रार पत्राद्वारे मांडल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.. 8 नोव्हेंबर रोजी शरद पवार अकोल्याच्या दौऱ्यावर असताना तो तरुण शरद पवार यांना भेटला होता.. आणि त्याने '34 वर्षाचा होऊन सुद्धा लग्न होत नाही, एकटेपणा जाणवतो अशी तक्रार त्या पत्रात मांडली होती, शरद पवारांनी मुंबईत पोहोचल्यानंतर आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र दाखवललं आणि विदर्भातील खासकरून अकोल्यातील पदाधिकाऱ्यांनी त्या तरुणाला मदत करावी असे निर्देश दिले आहे.. आमचे पक्षातील स्थानिक पदाधिकारी त्या तरुणांसाठी जे करता येईल ते प्रयत्न करतील असेही अनिल देशमुख म्हणाले.. ग्रामीण भागातील तरुणांचे लग्न होत नाही.. तरुण मुली शेतकरी नवरा नको अशी भूमिका घेत असून  ही एक सामाजिक समस्या झाली आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे असंही देशमुख म्हणाले..

काय लिहिलं आहे पत्रात?

आदरणीय साहेब!, माझे वय वाढत आहे. मी आता 34 वर्षांचा आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहील. तरी, माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही मी तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालविण्याची हमी देतो. साहेब!, मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. 

 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai BMC Standing Committee :बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?
बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
Embed widget