एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

HDFC चे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवींची हत्या व्यावसायिक ईर्षेतून

कल्याणमधील हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत सिद्धार्थ संघवींचा मृतदेह आढळला.

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले एचडीएफसीचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला. कल्याणमधील हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. संघवींना मिळालेल्या व्यावसायिक यशामुळे ईर्षेपोटी सहकाऱ्यांनी त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लोअर परेलमधील ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सिद्धार्थ यांची हत्या केल्याची कबुली चौघांपैकी एकानेच पोलिसांकडे दिली होती. चौघा संशयितांपैकी दोघे जण सिद्धार्थ यांचे सहकारी आहेत, तर एक कॅब चालक आणि एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. 20 वर्षीय कॉन्ट्रॅक्ट किलर रईस उर्फ सर्फराझ शेखने सिद्धार्थ यांचा मृतदेह कल्याणजवळ पुरल्याची माहिती दिली होती. सिद्धार्थ संघवी यांचं व्यावसायिक यश सहकाऱ्यांना खुपल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या 11 वर्षांत त्यांची झालेली पदोन्नती आणि वेतनवाढ सहकाऱ्यांना सलत होती. एचडीएफसीच्या लोअर परेल शाखेत सिनिअर एक्झिक्टुटिव्ह म्हणून सिद्धार्थ संघवी क्रेडिट अँड मार्केट रिस्कवर लक्ष ठेवून होते. 2007 मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) म्हणून सिद्धार्थ संघवी बँकेत रुजू झाले. 2011 मध्ये सहाय्यक उपाध्यक्ष (असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून त्यांची पदोन्नती झालं. 2015 मध्ये संघवींची वर्णी डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंटपदी लागली. 2017 मध्ये संघवी उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) झाले. 11 वर्षांच्या कालावधीत तीन वेळा मिळालेल्या पदोन्नतीमुळे सहकाऱ्यांचा जळफळाट होत होता. 'त्या' रात्री काय झालं? सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासोबत राहत होते. बुधवारी रात्री ऑफिस सुटल्यानंतर ते लोअर परेलहून मलबार हिलच्या दिशेने निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलंही, मात्र ते घरी न पोहचल्याने कुटुंबीय काळजीत पडले. सिद्धार्थ संघवींचा फोन बंद होता. रात्रभर वाट पाहून शोधाशोध केल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली. शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात आढळली होती. गाडीत रक्ताचे डागही सापडले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget