एक्स्प्लोर

'चार्ली हेब्दो'चं वादग्रस्त कार्टून छापणाऱ्या संपादकाला हायकोर्टाचा दिलासा

दुसर्‍या दिवशी 19 जानेवारी 2015 रोजी त्यांनी घडलेल्या घटनेबाबत जाहीर माफीनामा आपल्या दैनिकात प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आपला पेपर बंद करून दळवी आपल्या परिवारासह एका अज्ञात स्थळी निघून गेल्या होत्या.

मुंबई : फ्रांस नियतकालीक चार्ली हेब्दो याच्या वादग्रस्त मुखपृष्ठाचा वापर आपल्या दैनिकात करणाऱ्या संपादक शिरीन दळवी यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. स्टेट सीआयडीनं या प्रकरणी दाखल केलेला 'सी समरी' रिपोर्ट विचारात घेता हायकोर्टानं यासंदर्भातील याचिका निकाली काढली आहे. एखाद्या प्रकरणात जेव्हा तपासयंत्रणेला तक्रार ना खरी ना खोटी आढळते. आणि जेव्हा गुन्हा हा चुकून नोंदवला गेल्याचं लक्षात येतं तेव्हा हा 'सी समरी' रिपोर्ट कोर्टात दाखल केला जातो.

शिरीन दळवी यांनी 17 जानेवारी 2015 रोजी आपल्या 'अवधनामा' या दैनिकात महंम्मद पैंगबराचं 'ते' वादग्रस्त व्यंगचित्र एका लेखासोबत प्रदर्शित केलं होतं. जगभरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुंबईतही त्याविरोधात गदारोळ माजू लागला होता. तेव्हा पोलिसांनी दळवी यांना मुंब्रा इथून अटक केली होती.

त्यानंतर लागलीच दुसर्‍या दिवशी 19 जानेवारी 2015 रोजी त्यांनी घडलेल्या घटनेबाबत जाहीर माफीनामा आपल्या दैनिकात प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आपला पेपर बंद करून दळवी आपल्या परिवारासह एका अज्ञात स्थळी निघून गेल्या होत्या. त्यांना तसेच त्यांच्या परिवारवाला जीवे मारण्याच्या धमक्या तसेच राज्यभरातील अनेक पोलीस स्टेशन्समधून त्यांच्या नावाचे समन्स त्यांच्या घरावर लावले जाऊ लागले.

याविरोधात दळवी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर यंत्रणा कुणालाही तक्रार दाखल करण्यापासून थांबवू शकत नाही, मात्र सर्व तक्रारी एका पोलीस स्थानकात वर्ग करुन कारवाई सुरू ठेवता येऊ शकते. असे निर्देश दोत त्यांच्याविरोधात कोणतीही कडक कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.

त्यानंतर वारंवार हायकोर्टानं दिलेला हा दिलासा कायम होत गेला. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून स्टेट सीआयडीकडे सोपवला होता. पोलिसांनी दळवी यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आयपीसी 295 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुका नसल्या तरी घराघरात पोहोचा, जाती धर्माचं राजकारण करु नका, एकोपा तयार करा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना
निवडणुका नसल्या तरी घराघरात पोहोचा, जाती धर्माचं राजकारण करु नका, एकोपा तयार करा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget