एक्स्प्लोर
हाजी अली दर्गा प्रवेश: हायकोर्टाचा नेमका निर्णय काय?

मुंबई: हाजीअली दर्ग्यात महिला प्रवेश देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण आपल्याच आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवादींना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ६ आठड्यांची स्थगिती दिली आहे. स्त्री-पुरुषाला समान अधिकार राज्यघटनेनं नागरिकांना दिलेल्या अधिकारानुसार महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व ठिकाणी प्रवेश दिला जावा, याचा पुनरुच्चार मुंबई उच्च न्यायालयाने केला. न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट करत कायदा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे हाजीअली दर्ग्यात महिलांनादेखील प्रवेश दिला जावा असे आदेश न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी दिलेत. हायकोर्टानं यासंदर्भात संविधानाच्या कलम 14,15 आणि 25 चा उल्लेख केला. या कलमाच्याआधारे प्रत्येक स्त्री-पुरुषाला संविधानाने त्यांच्या मर्जीच्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. विद्या बाळ यांच्या याचिकेचा उल्लेख शबरीमला आणि इतर देवस्थानात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्या प्रकरणात आतापर्यंत काय झाले त्याची माहिती न्यायालयाला द्यावी आमचा निकाल तयार आहे, असं न्यायालयाने आधी स्पष्ट केले होते. तर पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या याचिकेवर झालेल्या निर्णयाचा संदर्भ आम्ही हाजीअली दर्ग्यातील महिलांना प्रवेशाबाबतच्या याचिकेत घेतलाय, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांनुसार महिलांना कुठेही प्रवेश नाकारला जावू नये असं असतानाही, राज्य सरकार याचे पालन करत नाही अशी याचिका विद्या बाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर निकाल देताना महिलांना सर्व ठिकाणी प्रवेश देण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. राज्य सरकारची सावध भूमिका तर याच याचिकेवर राज्य सरकारने मात्र सावध भूमिका घेतली होती. स्त्री पुरुष समानता कायदा असताना महिलांना प्रवेश बंदी करणे हे योग्य नसून राज्य सरकारी ही याचे समर्थन करणार नाही. पण जर कुराण- ए- शरीफ आणि मुस्लिम धर्मात तशी तरतूद असेल तर तशी शहानिशा केली जाईल असेही राज्य सरकारने आधीच न्यायालयात स्पष्ट केले आहे होते. याचिका कर्त्यांचं म्हणणं हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यावा की नाही हा मुद्दा संवेदनशील असल्याने महाधिवक्तांना सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तर, २०१२ पूर्वी हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश होता. कारण फिजा चित्रपटात दर्ग्याच्या आत अभिनेत्रीचे चित्रीकरण करण्यात आले होते. तर मगदूब बाबा दर्गा माहिम दर्ग्यात महिलांना प्रवेश आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माहिम दर्गा आणि हाजीअली दर्गा या दोन्ही दर्ग्याचे ट्रस्टी एकच आहेत. ही माहिती याचिका कर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. नूरजहाँ नियाज आणि झाकिया सोमन या भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दर्ग्यातील कबरीजवळ महिलांच्या प्रवेश बंदी विरोधात याचिका दाखल केली होती.
संबंधित बातम्या
हाजी अली दर्ग्याचा वाद नेमका काय?
हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश, हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























