एक्स्प्लोर
Advertisement
कामत समर्थनार्थ 25 काँग्रेस नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. माजी खासदार गुरुदास कामत यांना समर्थन देण्यासाठी पालिकेतील काँग्रेसचे 25 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई महापालिकेत सध्या काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. यातील कामत गटाच्या 25 नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. कामतांच्या राजकीय संन्यासाला विरोध दर्शवण्यासाठी असंतुष्ट काँग्रेस नगरसेवक धरणं आंदोलन करत आहेत.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मंगळवारीच पक्षनेतृत्वाला पत्र लिहून मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुंबई पालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट पक्षाला घातक ठरण्याचे संकेत आहेत.
पालिका तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुरुदास कामत, कृष्णा हेगडे आणि इतरांनी दंड थोपटले आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.
काँग्रेस नेते गुरूदास कामतांचा राजकारणातून संन्यास
पालिका निवडणुकीला अवघं वर्ष उरलं असताना मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. संजय निरुपम यांच्या कारभारावर नाराज असलेल्यांनी आवाज बुलंद केला. त्यात आघाडी घेतलीय ती गुरुदास कामत यांनी. नेहमीच्या आक्रमक स्टाईलमध्ये फक्त नाराजी व्यक्त करुन न थांबता कामत यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला.सोनियांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय...
44 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये काम करतोय. इतरांना संधी मिळावी म्हणून मी विश्रांती घ्यायचा निर्णय घेतलाय. 10 दिवसांपूर्वी सोनिया गांधींना भेटून मी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर पत्र पाठवूनही सोनिया आणि राहुल गांधींना निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. अखेर मी अधिकृतरित्या त्यांना कळवून काँग्रेस आणि राजकारणातून संन्यास घेतोयसोनिया गांधींनी वेळ देऊनही गुरुदास कामतांनी भेट घेतली नाही
कामत यांनी नाराजीचा सूर आळवल्यानंतर आमदार कृष्णा हेगडेंनीही निरुपम यांना घरचा आहेर दिला आहे. ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हणत हेगडेंनी संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. निरुपम अध्यक्ष झाल्यानंतर प्रिया दत्त यांची कोंडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरु झाला. ज्यातून निरुपम समर्थक अस्लम शेख आणि दत्त समर्थक नसीम खान यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यामुळे मुंबई काँग्रेस परंपरागत देवरा गट, प्रिया दत्त यांचा गट, गुरुदास कामत गट आणि निरुपम गटात विभागली गेली आहे.गुरुदास कामतांच्या घरासमोर समर्थकांची घोषणाबाजी
एकीकडे भाजप आणि शिवसेनेनं पालिकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय. तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत भांडणात गुंतलीय. नेते नाराज आहेत, कार्यकर्ते सैरभैर आहेत. गटातटामुळे जनतेला नेमका कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीए. आता अशा स्थितीत काँग्रेस पालिका निवडणूक कशी जिंकणार? हा प्रश्न उरतो.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement