एक्स्प्लोर
गुजराती लॉबी बळकट करण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती लॉबी बळकट करण्यासाठी शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमधल्या गुजराती नेत्यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंती मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाषिक मतदारांमध्ये मोर्चेबांधणीसाठी शिवसेनेनं कंबर कसल्याचं चित्र आहे. पर्युषण पर्वात मांस, मासे विक्रीवरून आणि मराठी भाषिकांना घरं नाकारण्यावरून शिवसेनेनं याआधी गुजराती भाषिकांवर कायमच टीका केली आहे. आता त्याच गुजराती समाजाचा मतदार निवडणुकांमध्ये आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेले दिसतात.
आणखी वाचा























