Sanjay Raut : मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर; संजय राऊत यांचा भाजपला टोला
Sanajay Raut on BJP remark : मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर होत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे.
Sanajay Raut on BJP remark on Mamata Banjerjee Mumbai visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांचा मुंबई दौरा केला. मात्र, या दौऱ्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडू लागला आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावर टीका करताना राज्यातील तरूणांना वडापाव विकायला लावणार आणि उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाणार आहात का? असा प्रश्न उपस्थित केला होता. या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात होत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले, vibrant Gujarat ची प्रसिद्ध झालेली जाहिरात ट्वीवट केली आहे. ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात.आज vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय.आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून, असे संजय राऊत यांनी म्हटले.
भाजपचे मुंबई प्रेम हे बेगडी असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरात पळवून नेले तेव्हा भाजपचे बोलभिडू शेपूट घालून का बसले, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. योगी आदित्यानाथ मुंबईतील सिने उद्योग उत्तर प्रदेशात खेचण्यासाठी शर्थ करत असल्याची आठवणही राऊत यांनी भाजप नेत्यांना करून दिली.
मुंबईतून international finance centre गुजरातला पळवून नेले तेव्हा भाजपचे बोलभीडू शेपूट घालून का बसले? योगी आदित्यनाथ मुंबईतील सिने उद्योग उत्तर प्रदेशात खेचण्यासाठी शर्थ करीत आहेत.. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करण्याआधी आपल्या खाली किती टाके पडले आहेत ते पहा.. pic.twitter.com/NNulmHch3F
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2021
भाजपचे बेगडी मुंबई प्रेम.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2021
ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात.आज vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय.आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून. pic.twitter.com/ezOw7tz7Os
काय म्हणाले होते आशिष शेलार?
ममता बॅनर्जी यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे. रोजगार निर्मिती व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण राज्यातील उद्योग बाहेर घेऊन जात आहेत का? राज्यातील तरूणांना वडापाव विकायला लावणार आणि उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाणार आहात का? बंगला देशी लोकांशी तुमचं नातं काय आहे ? गुप्त बैठका का घेत आहेत? वाघीण म्हणून पाठराखण करत असाल तर त्रिपुरा येथे झालेल्या पराभवाबद्दल रुदालीचा कार्यक्रम ठेवा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
ममता बॅनर्जी यांच्याकडून राष्ट्रगीताचा अपमान? भाजप नेत्याकडून पोलिसात तक्रार
भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे; नाना पटोलेंचे ममता बँनर्जींना उत्तर
Mamata Banergee : काँग्रेसला वगळून आघाडी करणार, जे लढतील त्यांना सोबत घेणार; ममता बॅनर्जींचे संकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha