(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GST Bhavan : मुंबईतलं जीएसटी भवन असणार आहे खास... पर्यावरणपूरक भवनाच्या खासियत जाणून घ्या...
GST Bhavan : राज्य शासनाच्या सर्वच विभागांची कार्यालये स्वत:च्या जागेत असली पाहिजेत. इमारती स्वच्छ, सुंदर, आकर्षक असल्या पाहिजेत यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. GST भवन असंच खास असणार आहे.
CM Uddhav Thackeray at GST Bhavan : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज मुंबईतील वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह दिग्गज नेते आणि अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील वडाळा या मध्यवर्ती ठिकाणी, नवीन जीएसटी भवनाचे भूमीपूजन झालं. जीएसटी हा राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग आहे. या विभागाचं हे नवीन ऑफीस मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी होणार आहे. मुंबई लोकल, मेट्रो रेल्वे, मोनो रेल, बस, टॅक्सीनंही इथं सहज पोहचता येणार आहे. मेट्रोचं स्टेशन जीएसटी इमारत संकुलातच असणार आहे. नव्यानं उभ्या राहत असलेली इमारत वैशिष्ट्यपूर्ण व पर्यावरणपूरक असणार आहे.
नियोजित नवीन जीएसटी भवन इमारत 22 मजल्यांची
नियोजित नवीन जीएसटी भवन इमारत 22 मजल्यांची असून , या इमारतीमध्ये एकाच वेळी 8000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करू शकतील व 1600 पेक्षा अधिक लोक एकाच वेळी कार्यालयास भेट देऊ शकतील. या व्यतिरिक्त, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची इतर काही कार्यालये व निवासी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रही येथे असणार आहे.
राष्ट्राच्या आर्थिक जडणघडणींमध्ये महाराष्ट्राचे अमूल्य योगदान
राष्ट्राच्या सर्वांगीण , विशेषतः आर्थिक जडणघडणींमध्ये महाराष्ट्राचे अमूल्य योगदान नेहमीच राहिले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत जीडीपी व करसंकलनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे. देशाच्या जीडीपीत राज्याचा हिस्सा 13.9% आहे. राज्याच्या आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असलेल्या राज्यकर विभागाने राज्याच्या विकासात मोलाची भूमिका कायम बजावलेली आहे. राज्याच्या कराद्वारे मिळणाऱ्या एकूण महसुलात राज्यकर विभागाचा वाटा 65% च्या जवळपास राहिला आहे. 2017-18मध्ये देशाच्या जीएसटी करसंकलनात राज्याचा हिस्सा 14.20% होता तो सध्या वाढून 14.70% इतका झाला आहे . सन 2021-22 मध्ये फेब्रुवारीपर्यंत देशाचे एकूण जीएसटी करसंकलन 995562 कोटी असून मागील वर्षाच्या तुलनेत 29% वाढ साध्य झाली आहे. याच काळात महाराष्ट्र राज्याच्या जीएसटी करसंकलनातील वाढ 33% असून आत्तापर्यंतचे एकूण करसंकलन 217589 कोटी झाले आहे, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
CM Uddhav Thackeray : महाराष्ट्राला बदनाम करु नका, आम्ही सर्वजण एकत्र : मुख्यमंत्री ठाकरे
Ajit Pawar : अजित दादा थेट बोलले, मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो म्हणून बातम्या येतात!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha