सकारात्मक बातमी! राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; आज 118 नवे रुग्ण, राज्यातील आकडा 3320 वर
राज्यातील कोरोना संक्रमितांच्या संख्येत आज घट झालेली पाहायला मिळाली. आज नवीन 118 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण आकडा 3320 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुंबई : सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कोरोना बाधितांच्या संक्रमणाचा वेग राज्याती कमी झाला आहे. आज राज्यात कोरोनाबाधीत 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. आज दिवसभरात 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 3320 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे पाच, पुण्यातील दोन जण आहेत. त्यापैकी पाच पुरुष तर दोन महिला आहेत. आज झालेल्या सात मृत्यूपैकी सहाजण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या सात जणांपैकी सात रुग्णांमध्ये (71 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 201 झाली आहे.
आनंदाची बातमी! देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला : आरोग्य मंत्रालय
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी) मुंबई महानगरपालिका : 2085 (122) ठाणे : 26 (2) ठाणे मनपा : 96 (1) नवी मुंबई मनपा : 63 (3) कल्याण डोंबवली मनपा : 68 (2) उल्हासनगर मनपा : 1 भिवंडी निजामपूर मनपा : 1 मीरा भाईंदर मनपा : 53 (2) पालघर : 14 (1) वसई विरार मनपा : 61 (3) रायगड : 8 पनवेल मनपा : 28 (1) ठाणे मंडळ एकूण : 2507 (137) नाशिक : 3 नाशिक मनपा : 5 मालेगाव मनपा : 45 (2) अहमदनगर : 19 (1) अहमदनगर मनपा : 9 धुळे : 1 (1) धुळे मनपा : ० जळगाव : ० जळगाव मनपा : 2 (1) नंदूरबार : ० नाशिक मंडळ एकूण : 84 (5) पुणे : 17 पुणे मनपा : 450 (46) पिंपरी चिंचवड मनपा : 37 (1) सोलापूर : 0 सोलापूर मनपा : 12 (1) सातारा : 7 (2) पुणे मंडळ एकूण : 523 (50) कोल्हापूर : 2 कोल्हापूर मनपा : 3 सांगली : 26 सांगली मिरज कुपवाड मनपा:० सिंधुदुर्ग : 1 रत्नागिरी : 6 (1) कोल्हापूर मंडळ एकूण : 38 (1) औरंगाबाद : 0 औरंगाबाद मनपा : 28 (2) जालना : 2 हिंगोली : 1 परभणी : 0 परभणी मनपा : 1 औरंगाबाद मंडळ एकूण : 32 (2) लातूर : 8 लातूर मनपा : 0 उस्मानाबाद : 3 बीड : 1 नांदेड : 0 नांदेड मनपा : 0 लातूर मंडळ एकूण : 12 अकोला: 7 (1) अकोला मनपा : 7 अमरावती : ० अमरावती मनपा : 5 (1) यवतमाळ : 13 बुलढाणा : 21 (1) वाशिम : 1 अकोला मंडळ एकूण : 54 (3) नागपूर : 2 नागपूर मनपा : 55 (1) वर्धा : 0 भंडारा : 0 गोंदिया : 1 चंद्रपूर : 0 चंद्रपूर मनपा : 2 गडचिरोली : 0 नागपूर मंडळ एकूण : 60 (1) इतर राज्ये : 11 (2) एकूण : 3320 (201)
अर्थमंत्री अजित पवार यांचे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्धकरून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.) राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 330 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5850 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 20.50 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
Health Minister on #Corona | देशभरात कोरोनाचे 1007 नवे रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती