एक्स्प्लोर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विरारचे जावई, सासुरवाडीतही शोककळा

पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विरारमध्ये येऊन गेले होते. दरम्यान त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असताना त्यांच्या सासुरवाडीत देखील शोककळा पसरली आहे.

विरार : गोव्याचे मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांची सासरवाडी विरार येथील होती. 1957 ते 1977 या कालावधीत त्यांचे सासरे नीलकंठ कोटणीस हे विरार आगाशी येथील के. जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. निवृत्तीनंतर ते आपल्या कुटुंबियांसह विरार मधून ते पुणे येथे राहण्यास गेले आहेत. पर्रिकर यांच्या पत्नी मेघा यांचे 20 वर्षांपूर्वीच निधन झाले. कोटणीस सरांना मेघा यांच्यासह अन्य तीन मुलं होती. पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विरारमध्ये येऊन गेले होते. दरम्यान त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असताना त्यांच्या सासुरवाडीत देखील शोककळा पसरली आहे. VIDEO | लढवय्या नेता हरपला, मनोहर पर्रिकरांचा अल्पपरिचय | एबीपी माझा पर्रिकरांच्या निधनानंतर एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सोमवारी एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पर्रिकर  यांच्या निधनामुळे देशाची राजधानी, केंद्र शासित प्रदेश आणि राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी उद्या, सोमवारी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. तर गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 18 मार्च ते 24 मार्च दरम्यान गोव्यात दुखवटा घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक देखील बोलावली आहे. यावेळी पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सोबतच पर्रिकर  यांच्या योगदानाबद्दल एक प्रस्ताव देखील पारित केला जाणार आहे. VIDEO | गिरीश कुबेर यांच्याकडून मनोहर पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा | एबीपी माझा मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार, असा असेल शेवटचा प्रवास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. अखेर त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. उद्या सोमवार, 18 मार्च रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
  • सकाळी 9.30 ते 10.30 - मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजी येथील भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल.
  • सकाळी 10.30 वाजता पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमी येथे हलविले जाईल.
  • 11 ते 4 वाजेपर्यंत : सामान्य लोकासांठी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल.
  • दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कारासाठी मीरामार येथे पर्रिकर यांचे पार्थिव हलविले जाईल.
  • 4.30 वाजता : अंतिम विधी सुरु होईल.
  • सायंकाळी 5 वाजता पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील.

लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

आज सकाळी मनोहर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून मनोहर पर्रीकर यांना झोपूनच राहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळपेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती काहीशी सुधारली होती. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय
    • संपूर्ण नाव : मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर
    • गोव्यातल्या म्हापसामध्ये जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी जन्म
    • लोलोला हाय स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण
    • मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण (पर्रिकर भारतातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि परिले आयआयटीयन जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले)
    • विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत
    • 1994 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले
    • 2001 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले
    • त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये (2001) ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचं सरकार केवळ दीड वर्ष टिकले
    • जून 2002 मध्ये पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले
    • 2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले
    • पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं
    • 2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली.
    • पर्रिकर संरक्षणमंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला
    • गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
    • 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
    • 2018 मध्ये पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले
संबंधित बातम्या

लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय  

'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा मनोहर पर्रिकरांनी सुचवलं

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kumar Saptarshi Vastav 139 : गांधींचा विचार विरोधकांना तारेला का? कुमार सप्तर्षींची सडेतोड मुलाखतSardesai Wada Sangameshwar: Chhatrapati Sambhaji Maharaj कैद झालेला सरदेसाईंचा वाडा आहे तरी कसा?Chatrapati Sambhaji Maharaj Smarak : संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणारChandrashekhar Bawankule Uddhav Thackeray:उद्धव ठाकरे- बावनकुळेंचा एकाच लिफ्टने प्रवास, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
Ranya Rao Arrest : पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या
हमाम मे सब 'नंगे'... मंत्री जयकुमार गोरेंचा राजीनामा घेतला तर 288 आमदारांचे राजीनामा घ्यावे लागतील - हाके
हमाम मे सब 'नंगे'... मंत्री जयकुमार गोरेंचा राजीनामा घेतला तर 288 आमदारांचे राजीनामा घ्यावे लागतील - हाके
मुंडेंचा राजीनामा, सुरेश धसांच्या दोन बायका, आज गोरेंचं हे प्रकरण, औरंगजेबच्या औलादी राज्य करतात का? सोलापुरात ठाकरे गट आक्रमक!
मुंडेंचा राजीनामा, सुरेश धसांच्या दोन बायका, आज गोरेंचं हे प्रकरण, औरंगजेबच्या औलादी राज्य करतात का? सोलापुरात ठाकरे गट आक्रमक!
Embed widget