कोरोना संसर्गावर 103 रुपयांची गोळी प्रभावी; ग्लेनमार्क कंपनीचा दावा
कोरोना संसर्गावर 103 रुपयांची गोळी प्रभावी ठरत असल्याचा दावा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीने केला आहे.
मुंबई : 'ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स’ या औषध कंपनीने फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. कोरोना संसर्गाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर हे औषध प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली.
‘भारतीय औषध महानियंत्रक’ (DCGI) संस्थेकडून औषध उत्पादन आणि वितरणाची परवानगी मिळाली असल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले आहे. कोरोना संसर्गावरील उपचारासाठी अशा प्रकारची मंजुरी मिळालेले ‘फॅबीफ्लू’ हे गोळ्यांच्या रूपात सेवन करता येणारे पहिले ‘फॅविपिराविर’ औषध आहे, असा कंपनीचा दावा आहे.
औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे यात औषधाच्या एका गोळीची साधारण किंमत 103 रुपये आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी 1800 मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यांनतर 14 दिवसांपर्यंत 800 मिलिग्रॅमचे दोन डोस दररोज घ्यायचे आहेत.
गावात परतलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळणार, 'गरीब कल्याण रोजगार अभियान'चं उद्घाटन
24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजारांपेक्षा जास्त वाढ देशात पहिल्यांदाच 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार पेक्षा जास्तने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली तर 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 इतके आहेत. गेल्या 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती
महाराष्ट्रात काल 3827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1935 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 55 हजार 651 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त ज्यादा ॲक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. यानंतरर दिल्ली, तमिलनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत. ॲक्टिव्ह केसेसमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
India Corona Update | देशात पहिल्यांदाच 24 तासात 14 हजारांहून अधिक कोरोनाबाधित