एक्स्प्लोर
गिरीष महाजन छगन भुजबळांच्या भेटीला, भेटीचं कारण गुलदस्त्यात
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. सांताक्रुझमधील भुजबळांच्या निवासस्थानी जाऊन महाजनांनी छगन भुजबळांशी चर्चा केली.
![गिरीष महाजन छगन भुजबळांच्या भेटीला, भेटीचं कारण गुलदस्त्यात girish mahajan meets chagan bhujbal in mumbai latest updates गिरीष महाजन छगन भुजबळांच्या भेटीला, भेटीचं कारण गुलदस्त्यात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/03174120/chagan-bhujbal-girish-mahajan-meet.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. सांताक्रुझमधील भुजबळांच्या निवासस्थानी जाऊन महाजनांनी छगन भुजबळांशी चर्चा केली.
गिरीष महाजन यांनी छगन भुजबळांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी महाजन भुजबळांच्या भेटीला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
काल शनिवारीच शरद यादव यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. तसंच लालूप्रसाद यादवांनीही भुजबळांशी फोनवरुन बातचीत केली होती.
छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं राजकीय वजन वाढताना दिसत आहे. त्यामुळेच गिरीष महाजनांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत चर्चाही सुरु झाल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)