एक्स्प्लोर

घाटकोपर इमारत दुर्घटना, आरोपीचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज

घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी सुनील शितपनं तात्पुरत्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

मुंबई : घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी सुनील शितपनं तात्पुरत्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आपल्या आईची तब्येत सध्या फारच खालवली असल्यानं तिची सेवा करण्यासाठी आपल्याला काही दिवसांचा जामीन देण्यात यावा, अशी विनंती शितपनं हायकोर्टाला केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. हायकोर्टानं शितपच्या अर्जावर मुंबई पोलिसांचा अहवाल मागवला असून त्यांना शितपनं केलेल्या दाव्यांची शहानिशा करुन सोमवारपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुढील आठवड्यात सुट्टीकालीन न्यायालयात या अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात शितपच्या आईची तब्येत अचानक बिघडली आणि तिच्या छातीत दुखू लागलं. शितपच्या परिवारात त्याची आई, पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. त्यामुळे आईची काळजी घेण्यासाठी, तिला डॉक्टरकडे नेण्या-आणण्यासाठी घरात कुणीही कर्ता पुरुष नाही, असा दावा शितपनं या अर्जात केला आहे. यंदा पार पडलेल्या पालिका निवडणुकीत घाटकोपर परिसरातून सुनील शितप यांच्या पत्नीनं शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेनेत शितप यांचं या परिसरात राजकिय वजन आहे. याचा फायदा घेत शितप बाहेर पडले तर ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, असा दावा या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या वतीनं हायकोर्टात करण्यात आला आहे. 25 जुलै 2017 रोजी झालेल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेत एकूण बारा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शितपप्रमाणेच त्या इमारतीत नूतनीकरणाचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट यांनाही सहआरोपी करण्यात आलं आहे. सुनील शितपकडून सदर इमारतीतील सदस्यांना धमकावलं जात होतं. सुनील शितपला आपण करत असलेल्या कृत्याची पूर्ण माहिती होती, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget